साक्षी गुरनुले ची आंतरराज्यीय कराटे स्पर्धेसाठी निवड

39

मूल : स्थानिक प्रतिभा कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील बीए द्वितीय वर्षाची साक्षी ज्ञानेश्वर गुरनुले ही गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली आंतर महाविद्यालयीन कराटे स्पर्धेत सहभागी झाली होती. या स्पर्धेतून तिची निवड अखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धेकरिता झाली आहे.

ही स्पर्धा कुरूक्षेत्र विद्यापीठ, हरियाणा येथे १४ मार्च रोजी होणार आहे. तिच्या प्रवासाचा खर्च संस्थेमार्फत करण्यात येणार असून, ७ हजार रुपयांचा धनादेश तिला महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. वंदना गोवर्धन, प्रा. विजयकुमार दुर्गे यांच्या हस्ते देण्यात आला.

यावेळी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. तसेच संस्थेनी व महाविद्यालयानी तिला या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी शुभेच्छा दिल्या.