शिधापत्रीका दुय्यम/नविन/नाव कमी करणे/नाव चढविणे याबाबत कागदपत्रेही लागणार

59

पूर्वी रेशन कार्डसाठी केवळ आधार कार्ड नसले तरी निभावून जायचे. आता मात्र कागदपत्रांची संख्या वाढविण्यात आली आहे. जन्मदाखला अनिवार्य केला असून जातीचा दाखला व शैक्षणिक कागदपत्रे द्यावी लागतील.

सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये रेशन कार्डधारक पारदर्शकता आणण्यासाठी हा धोरणात्मक निर्णय शासनस्तरावर अंत्योदय घेण्यात आला आहे. नवीन रेशन काढण्यासाठी आता आठ ते दहा प्रकारची कागदपत्रे द्यावी लागतील. आधी केवळ आधार काई नसले तरी रेशन कार्ड मिळायचे.

आता मात्र रेशन कार्डसाठी कागदपत्रे गोळा करतांना नवीन नाव समाविष्ट केले का? धावपळ करावी लागणार आहे. यादरम्यान नवीन काई मिळाले तरी त्याची ऑनलाईन नोंद घ्यावी लागते. त्याशिवाय रेशन धान्याचा लाभ मिळत नाही. वाढती लोकसंख्या, विभक्त कुटुंब पद्धतीमुळे रेशन कार्डच्या मागणीत वाढ होते. काही वेळा तांत्रिक अडचणीमुळे ऑनलाईनला नोंद होण्यास विलंब लागतो.

पुर्वी ही कागदपत्रे लागायाची  :-   रेशन कार्डसाठी पूर्वी आधार कार्ड, मतदान कार्ड, रहिवासी दाखला, उत्पन्नाचे प्रमाणपत्र ही कागदपत्रे लागायची.आता त्यात बदल केला आहे.

ही कागदपत्रे लागणार  :- नवीन रेशन कार्डसाठी कागदपत्रे, जातीचा दाखला, जन्म प्रमाणपत्र, वीज बिल व इतर माहिती मागविण्यात आली आहे. त्याशिवाय रेशन कार्ड मिळत नाही.

शिधापत्रीका दुय्यम/नविन/नाव कमी करणे/नाव चढविणे याबाबत खालील प्रमाणे अतिरीक्त
कागदपत्रे खालीलप्रमाणे
1) कुटुंबातील एकाचे जात प्रमाणपत्र
2) कुंटुबातील सर्वाचे पासपोर्ट साईज फोटो
3) मतदान ओळखपत्र झेराॅक्स प्रत
4) पॅनकार्ड झेराॅक्स प्रत / टिसी/मार्कसिट/जन्मदाखला यापैकी एक
5) अपंग असल्यास अपंगाचे प्रमाणपत्र
6. शिधापत्रिकेतील व्यक्तीच्या आईचे व वडीलांचे नाव नमूद करावे.
7) गॅस पासबूक झेराॅक्स
8) बॅंक पासबूक झेराॅक्स
9) सर्वाचे कुटुंबातील आधार कार्ड झेराॅक्स

नवीन नाव समाविष्ठ केले आहे काय ?

  •  घरात कुटुंबसंख्या कमी-अधिक झाल्यास त्याची नोंद रेशन कार्डवर घ्यावी लागते.नवीन नाव समाविष्ट केल्यास लाभार्थी संख्येनुसार मिळणाया धान्याचा लाभ घेता येतो. त्यासाठी नवीन सदस्यांची कागदपत्रे देऊन नाव समाविष्ट करून घेणे आवश्यक आहे.
  • रेशन कार्डसाठी पूर्वी लागणारया कागदपत्रांसोबत आता काही वाढीव कागदपत्रे देणे गरजेचे आहे. त्यानुसार कागदपत्रांची पूर्तता केल्यास रेशन कार्डची काई मंजूर केले जाते. रेशन कार्डमध्ये नावे कमी-अधिक करणे ही नियमित रेशन प्रक्रिया आहे.