आधार कार्डवरील जन्मतारीख आणि पत्ता अपडेट करायचाय? ही कागदपत्रं आहेत आवश्यक

44

        आधार कार्ड (Aadhar Card) हे अत्यंत महत्त्वाचं कागदपत्र असून विविध शासकीय कामं, तसंच योजनांच्या लाभासाठी हे प्रत्येक नागरिकाकडे असणं आवश्यक आहे. शैक्षणिक, नोकरी-व्यवसायविषयक, आर्थिक, बॅंकिंग आदी कामांसाठी आधार कार्ड गरजेचं असतं.

तसंच आता शासनाच्या बहुतांश योजना, अनुदान प्रक्रिया, कर्ज प्रक्रिया आदी ऑनलाइन (Online) असल्यानं त्याच्या लाभासाठी संबंधित लाभार्थ्याकडे आधार क्रमांक असणं आवश्यक आहे. परंतु, काही वेळा आधार कार्डवर जन्म तारीख (Birth Date) चुकल्यानं संबंधित नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो. त्याचप्रमाणे शहरात नोकरी व्यवसायानिमित्त राहणारी कुटुंबं सातत्यानं घरं बदलत असतात. अशावेळी त्यांना बदललेला पत्ता अपडेट (Home Address Update) करणं गरजेचं असतं.

आधार कार्डवरील जन्मतारखेची दुरुस्ती, घराचा पत्ता बदलण्यासाठी प्रक्रिया कशी असते, त्यासाठी कोणती कागदपत्रं आवश्यक असतात, याविषयी अनेकांना माहिती नसते. या दोन्ही बाबी करणं अत्यंत सोपं आहे. 

आधार कार्ड हा प्रत्येक ठिकाणी ग्राह्य धरला जाणारा दस्तऐवज आहे. त्यामुळे त्यावरची माहिती अपडेट असणं आवश्यक असतं. आधार कार्डवरचा घराचा पत्ता अपडेट करण्यासाठी 45 कागदपत्रांना (Documents) मान्यता देण्यात आली आहे.

यापैकी कोणतंही कागदपत्र तुमच्याकडे उपलब्ध असेल तर तुम्ही अगदी सहजपणे आधार कार्डावरचा पत्ता अपडेट करू शकता.                                                                                              या कागदपत्रांमध्ये प्रामुख्याने पासपोर्ट, बॅंक स्टेटमेंट किंवा पासबुक, रेशन कार्ड, निवडणूक ओळखपत्र, वाहन परवाना, सरकारी फोटो आयडी कार्ड, पीएसयूनं जारी केलेला सर्व्हिस फोटो आयडी, वीजबिल (तीन महिन्यांपेक्षा जुनं नसावं), पाणीपट्टी बिल (तीन महिन्यांपेक्षा जुनं नसावं), लँडलाइन टेलिफोन बिल (तीन महिन्यांपेक्षा जुनं नसावं), प्रॉपर्टी टॅक्स पावती (तीन महिन्यांपेक्षा जुनी नसावी), क्रेडिट कार्ड स्टेटमेंट (तीन महिन्यांपेक्षा जुनं नसावं),

            इन्शुरन्स पॉलिसी, एनआरईजीएस कार्ड, शस्त्र परवाना, पेन्शनर कार्ड, किसान पासबुक, सीजीएचएस किंवा ईजीएचएस कार्ड, इन्कम टॅक्स अॅसेसमेंट ऑर्डर, वाहन नोंदणी क्रमांक, नोंदणीकृत सेल किंवा लीज तसेच रेंट अॅग्रीमेंट, टपाल विभागाने जारी केलेले फोटोसह असलेले अॅड्रेस कार्ड, राज्य सरकारने जारी केलेले कास्ट किंवा डोमिसाइल सर्टिफिकेट (फोटो असलेले) या कागदपत्रांचा समावेश आहे.