स्पर्धा परिक्षेच्या विदयार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिली मोफत बससेवाश्रीकृष्ण ट्रव्हल्स आणि बजरंगी ट्रव्हल्सचा उपक्रम

29

स्पर्धा परिक्षेच्या विदयार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिली मोफत बससेवा
श्रीकृष्ण ट्रव्हल्स आणि बजरंगी ट्रव्हल्सचा उपक्रम
मूल :- शनिवारी जिल्हयात महाराष्ट लोकसेवा आयोगाची पूर्व तयारी परीक्षा पार पडली.परंतु एकीकडे महाराष्ट राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसेस बंद आहेत. त्यामुळे विदयार्थ्यांसमोर चंद्रपूर येथील परिक्षा केंद्रावर जाणे आव्हानात्मक होते.परंतु सोशल मिडीयावर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक येरमे यांनी शुक्रवारी विदयार्थ्यांसाठी साधने उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले होते.

त्यांच्या आवाहनाला मूल येथील श्रीकृष्ण ट्रव्हल्स आणि बजरंगी ट्रव्हल्स यांनी प्रतिसाद दिला. स्पर्धा परिक्षेच्या विदयार्थ्यांसाठी त्यांनी निशुल्क बसेस उपलब्ध दिली. त्यांच्या या कार्यामुळे स्पर्धा परिक्षेच्या विदयार्थ्यांना चंद्रपूर येथे वेळेत परिक्षा देता आली. सामाजिक कार्यात दाखविलेल्या तत्परतेमुळे विदयार्थ्यांना स्पर्धा परिक्षेचा पेपर सोडविता आला. दोन्ही ट्रव्हल्स धारकांनी सकाळच्या वेळेत आपली खासगी वाहने उपलब्ध करून दिल्याने अडचणीच्या काळात विदयार्थ्यांच्या चेह-यावर हास्य फुलले होते.तसेच विदयार्थ्यांची जाणे येण्याची गैरसोय यामुळे दुर झाली.

प्रत्येक विदयार्थी स्पर्धा परिक्षेत उतरला पाहिजे.ऐवढेच नव्हे तर यात यश मिळवून त्यांने गावाचे नाव रोशन करावे दृत्यांत्या यशात आमचे यश असल्याची भावना येथील श्रीकृष्ण ट्रव्हल्सचे संचालक मार्कंड कापगते आणि बजरंगी ट्रव्हल्सचे संचालक काजू खोब्रागडे यांनी व्यक्त केले. विदयार्थ्यांनी सुदधा दोन्ही संचालकांचे आणि तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक येरमे यांचे आभार मानले. त्यांच्या या कौतुकास्पद कार्यामुळे विदयार्थ्यांना महाराष्ट लोकसेवा आयोगाच्या परिक्षांसाठी जिल्हयाच्या केंद्रावर जाता आले.