प्रियदर्शन मडावी नेट परीक्षा उत्तीर्ण

35

युजीसी दिल्ली व्दारा नोव्हे,डीसेंबर 2021मध्ये घेण्यात आलेल्या नेट(राष्ट्रीय पात्रता परीक्षा सहाय्यक प्राध्यापक करीता) परीक्षेचा निकाला दिनांक 19/02/2022 रोजी घोषीत करण्यात आला. या परीक्षेत श्री प्रियदर्शन मोरेश्वरजी मडावी हे मराठी विषयात उत्तीर्ण झाले अहेत.
प्रियदर्शन मडावी हे मुळचे गोवर्धन ता मूल जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून ते सध्या जिल्हा परीषद उच्च प्राथमिक शाळा पेंढरीमक्ता पंचायत समिती सावली येथे विषय शिक्षक या पदावर कार्यरत आहेत.
यापूर्वी ते युजीसी दिल्ली व सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे व्दारा आयोजीत महाराष्ट्र सेट परीक्षा दिनांक 28 जानेवारी 2022 रोजी उत्तीर्ण केली आहे. तसेच गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत घेण्यात आलेल्या पीएच.डी.आचार्य ) पात्रता परीक्षा सुध्दा उततीर्ण झाले असून त्यांची गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे पीएच.डी.सुरू आहे.
श्री प्रियदर्शन मडावी हे सामाजीक व शैक्षणिक चळवळीत नेहमी अग्रेसर असतात. प्राथमिक शिक्षकाने नेट परीक्षा उत्तीर्ण केल्याबदल त्यांचे सामाजीक व शैक्षर्णिक क्षेत्रातून सर्वत्र कौतुक केले जात आहे.