मूल शहरात छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा कार्यक्रमाचे आयोजन, शिवशाही युवक मित्र परिवार यांचा उपक्रम

36

 

मुल प्रतिनिधी

शिवशाही युवक मित्र परिवार मुल द्वारा दरवर्षीप्रमाणे यंदाही छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा 2022 कार्यक्रमाचे आयोजन मूल शहरात करण्यात आले आहे.

17 फेब्रुवारी गुरुवारला मा.सा. कन्नमवार सभागृहात सायंकाळी 5 ते 10 पर्यंत व्याख्यानमालेत मुंबई येथील प्रसिद्ध व्याख्याते शिवश्री कपिल ढोके यांचे मार्गदर्शन मूल वासियांना लाभणार आहे.

सोबतच कोरोना काळात कोरोना योद्धा म्हणून प्रत्यक्ष परिस्थिती समजून मूल तालुक्यातील जनतेला माहिती पोहचवण्याचे काम पत्रकारांनी केले असून सामाजिक काम करीत आहेत. हा उद्देश समोर ठेऊन मूल शहरातील सर्व पत्रकारांचा सत्कार समारंभ कार्यक्रम ठेवण्यात आला आहे.

18 फेब्रुवारी शुक्रवारला उपजिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांना फळ वाटपाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे.

       19 फेब्रुवारी शनिवार ला सायंकाळी चार वाजेपासून भव्य महापूजन व पालखी सोहळा आयोजित केला आहे.

शिवशाही युवक मित्र परिवार तर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून कोरणा चे सावट लक्षात घेता नियमाप्रमाणे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कार्यक्रमाला शिवभक्तांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिवशाही युवक मित्र परिवारचे अध्यक्ष पंकज कोहळे, उपाध्यक्ष जितेंद्र सिंग पटवा, सचिव किसन शेरकी तथा पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केले आहे.