मुल येथे विद्यार्थिनींनी केले हिजाबचे समर्थन

38

 

मुल :

कर्नाटक राज्यातून सुरु झालेले हिजाब प्रकरण देशभर गाजत असतांनाच याचे लोन जिल्ह्यात पोहचले आहे. ‘हिजाब आमचा अधिकार आहे’ ‘भारतीय संविधानातील कलम 25 नुसार आम्हाला हिजाब लावण्याच्या अधिकार आहे’ असे फलक हातात घेवून मुल शहरातील मुस्लिम विद्यार्थिनी तसेच महिला यांनी हिजाबचे समर्थन केले आहे.

आयशा फातीमा बहुउद्देशिय महिला संस्था मूलचे वतीने उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांना निवेदन देत कर्नाटक राज्यात हिजाबच्या विरोधातील दंगेखोरांवर कारवाही करण्याची मागणी केली आहे.

मुस्लीम समाजातील मुली आपल्या परंपरेनुसार हिजाब हे वस्त्र आपल्या अंगावर परिधान करतात तसेच इतर समाजात ओढणी दुपट्टा व ईतर प्रकारचे कापड घेऊन आपल्या इच्छेनुसार राहण्यास भारतीय संवीधानाचा कलम 19, 20, 21, 22, 25 मध्ये असे मौलिक अधिकार दिलेले आहेत.

कर्नाटक राज्यात काही धर्म कंटकांनी असंवैधानिक मानून दंगा घडविण्याचा दृष्टीने शाळेत जावून मुस्लिम विद्यार्थिनींना हिजाब घालण्याकरीता मज्जाव करण्याचा प्रयत्न केला. हि बाब धार्मिक व मौलिक अधीकाराचा दृष्टीने अतीशय लाजीरवानी आहे. या प्रकरणातील दोषींवर कारवाही करण्याची मागणी फर्जाना शबीर शेख, वहिदा पठाण, शकीला शेख, आरिफा पठाण, सानिया जावेद शेख, शहनाज शेख, फातिमा दलाल, सानिया मुस्ताक शेख, गौसिया दलाल, अफरोज सय्यद, शहनाज दलाल, तौसिफ़ सय्यद यांनी केली आहे.