प्रेम म्हणजे प्रेम असतं,तुमचं आमचं सेम असत ना

81

कोणतेही नातं जोपासताना त्यातील काही नाती कधी कधी खूप जवळची वाटतात..पण, प्रत्यक्षात तो फक्त भास असतो…प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आमचं सेम असतं… या ओळी बाजारू प्रेमाने केव्हाच वाळीत टाकल्या अन् सेमचा गेम; करण्याची पहिली पायरी फ्रेंडशिप डे आणि खरा प्रयत्न होतो तो व्हॅलेंटाईन डेला पण, बाजारातील काही ठराविक दुकानांमध्ये मागील आठ दिवसांपासून शुभेच्छापत्रकं आणि भेटवस्तूंची दुकाने फुलून गेली असून खरंच याने प्रेम व्यक्त होते का, हा प्रश्न सहज उपस्थित होतो.

व्हॅलेंटाईन डे ला आठवते ते आपलं पहिलं प्रेम, ते प्रेम प्रत्येकाच्या वाट्याला येतं असं नाही. तर ती एक वा्याची झुळूक असते जी प्रत्येकाला अनुभव देत नाही. कधी कधी प्रेम जपून ठेवावं असतं. तर कधी जखमा देऊन जातं. आपल्या सोबत कुणीतरी हक्काचं माणूस असावं जे आपल्या सुख-दुःखात कायम सोबत राहील. अशा व्यक्तीच्या शोधात प्रत्येक जण असतो. काही थोडावेळ सोबत असतात तर काही आयुष्याचे साथीदार होऊन प्रेम फुलवितात. प्रत्येकाच्या सुखात फक्त एकच सूर असतो तो म्हणजे प्रेमाचा.

१४ फेब्रुवारी असून प्रेम व्यक्त करण्याचा दिवस आहे. मात्र, अनेकांनी या प्रेमाला मनात भरलं असेल, अशी व्यक्ती आई-वडील, भाऊ, बहीण, मित्र यावरही बाजारूपणाचे रूप दिल्याचे दिसून येत ओळखणे फार सोपे असतं. त्यामुळे करता येतं. इतकं साधं अन् सरळ प्रेम आहे. आयुष्यात कधीतरी प्रेम केलं असेल, करायला हवं. मग ते प्रेयसी, बायको, आयुष्यात प्रेमाला अढळ स्थान आहे. प्रेम असतं.

स्वार्थाविना केलेलं प्रेम म्हणजे व्हॅलेंटाईन नाही, याचा दकाता धणहा तेवढेच महत्त्वाचे आहे. वेगवेगळ्या देशात वहॅलेंटाईन डे वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. प्रत्येकासाठी प्रेमाच्या संकल्पनाही वेगवेगळ्या असतात. एखादा मुलगा आपल्या ७० वर्षीय आजीलाही गुलाब देऊन तिला व्हॅलेंटाईन बनवू शकतो. एखाद्या आईसाठी आपल्या मुलापेक्षा कोणता प्रेमळ व्हॅलेंटाईन होऊ शकेल, मित्रदेखील आपला व्हॅलेंटाईन होऊ शकतो. कोणत्याही स्वार्थाविना केलेलं प्रेम हाच व्हॅलेंटाईनचा खरा अर्थ आहे.