लक्ष्मण खोब्रागडे यांच्या काव्यसंग्रहाची निवड राज्यस्तरीय पुरस्कार

36

मराठी  साहित्य मंडळाच्या राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले साहित्य पुरस्कारासाठी लक्ष्मण खोब्रागडे ‘लिपन’ यांच्या या काव्यसंग्रहाची निवड झालेली असून येत्या २७ फेब्रुवारी २०२२ मराठी राजभाषा दिनी उस्मानाबाद येथे होणार्या राज्यस्तरीय कविसंमेलनात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

लक्ष्मण खोब्रागडे हे मूल तालुक्यातील जुनासुल्ला येथील युवा कवी असून त्यांचा ‘लिपन’,’मोरगाड’हा झाडीबोलीतील काव्यसंग्रह व ‘यश खेचून आणू दारी’ हा ललीतलेखसंग्रह प्रकाशित आहे.

त्यांचे झाडीबोलीवर संशोधनात्मक कार्य सुरू असून अनेक एकांकिका व वैचारिक लेख लिहिलेली आहेत. लक्ष्मण खोब्रागडे यांचे ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, भूभरीकार अरुण झगडकर, किशोर आनंदवार, रंजित समर्थ, शशीकला गावतुरे, डॉ. चंद्रकांत लेनगुरे, कमलेश झाडे, मारोती आरेवार, विनायक धानोरकर, डॉ. धनराज खानोरकर, प्रशांत भंडारे, प्रा. रत्नमाला भोयर, वृंदा पगडपल्लीवार, परमानंद जेंगठे, नागेंद्र नेवारे, मंगला गोंगले, रामकृष्ण चनकापुरे, संतोष उईके, अर्जुमन शेख, प्रीती जगझाप, भारती तितरे, संजीव बोरकर, नंदकिशोर मसराम आदी साहित्यिकांनी कौतुक केले आहे.