भेजगाव येते सरपंच चषक भव्य कबड्डी सामन्यांचे उद्घाटन

40

मुल – तालुक्यातील भेजगाव येथील यारी दोस्ती क्रीडा मंडळ यांच्या सौजन्याने आणि मुल तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक अखिल गागरेड्डीवर यांच्या पढाकाराने भव्य कबड़ी सामन्यांचे आयोजन करण्यात आले. दिनांक ९ व १० ,फेब्रुवारी २०२२ या द्विदिवशीय सामन्यांचे उदघाटन सरपंच संघटनेचे अध्यक्ष अखिल गांगरेड्डीवार यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी सह उदघाटक कोसंबी सरपंच रवींद्र कामडी,

कार्यक्रमाचे अध्यक्ष राजोली सरपंच जितेंद्र लोणारे,सह अध्यक्ष वीरइ सरपंच प्रदीप वाढई. उपाध्यक्ष फिस्कृती सरपंच नितीन गुरनुले, सह उपाध्यक्ष बोडाला सरपंच जालिंदर बांगरे, यांचे हस्ते करण्यात आले. 

दीपप्रज्वलन वलिंदर सातपुते,बंडू नर्मलवार, अनिल सोनूले, हिमानी वाकुडकर, गोविंदराव वनकर यांनी केले. भेजगाव येथील मोहनजी ताटपल्लीवर यांचे भव्य पटांगणावर आयोजित सरपंच चषक कबड्डी स्पर्धेत प्रथम बक्षीस ३१ हजार रुपये, द्वितीय बक्षीस २१ हजार रुपये.तृतीय बक्षीस ११ हजार रुपये १० तारखेला देण्यात येणार असून बक्षीस समारंभाचे प्रमुख पाहुणे हळदी सरपंच मेघाताई मडावी, नलेशवर सरपंच मनीषा तावडे, माजी सरपंच संजय फुलझेले, केळझर सरपंच काजूताई खोब्रागडे, यांचे शुभहस्ते होईल.

या समारंभाला विशेष अतिथी म्हणून तांडाळा उपसरपंच राहुल मुरकुटे, दीपक वाढई. विलास चापडे, अतुल बुरांडे, यशवंत खोब्रागडे, हळदी सरपंच महेश चीचघरे, बोर चांदली उपसरपंच हरिभाऊ एनग्नटीवार, चिखली उपसरपंच दुर्वास कडस्कर, सामाजिक कार्यकर्ते अमोल शेंडे, सुनील चापडे यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण होणार आहे.

यात आकर्षक वयक्तिक बक्षीस बेस्ट रेडर, चॅम्पियन, बेस्ट डीपेंडर देण्यात येणार आहे. भेजगाव पोलीस पाटील शशिकांत गणवीर,सदश वनिता लेंगुरे यांचे उपस्थितीत विदर्भात पहिल्यांदाच सरपंच चषक कबड्डी स्पर्धेचे आयोजन भेजगाव येथे होत असलयाने यारी दोस्ती क्रीडा मंडळाचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.