विहिरीत बिबट्याचा मृतदेह

41

 मूल : तालुक्यातील सोमनाथ येथील आमटे फार्म येथील एका विहिरीत बिबट्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. मूल तालुक्यातील बफर क्षेत्रात असलेल्या सोमनाथ येथील आमटे फार्मला लागून मोठे जंगल आहे.

या जंगलात वन्यप्राण्याची मोठी संख्या असून, परिसरात अनेक वन्यप्राणी फिरत असतात. दरम्यान, एका शेतातील विहिरीत बिबट शुक्रवारी मृतावस्थेत आढळून आला.

घटना उजेडात येताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. यानंतर वनकर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. शवविच्छेदनानंतर बिबट्याचे मृत्यूचे कारण पुढे येणार आहे.

शिकारीच्या शोधात बिबट विहिरीत पडल्याची चर्चा आहे.