प्रियदर्शन मडावी सेट परीक्षा उतीर्ण

30

युजीसी दिल्ली व सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे, द्वारा २६ सप्टेंबर २०२१ रोजी आयोजित महाराष्ट्र सेट परीक्षेचा निकाल २८ जानेवारी रोजी जाहीर करण्यात आला.

या परीक्षेत जि.प.शाळा पेंढरीमक्ता येथील विषय शिक्षक प्रियदर्शन मोरेश्वर मडावी मराठी विषयात सेट परीक्षा उतीर्ण झाले आहेत.

यापूर्वी गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीअंतर्गत घेण्यात आलेल्या पीएचडी (आचार्य) पात्रता परीक्षेत उतीर्ण झाले असून त्यांची गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे पीएचडी सुरू आहे.

प्रियदर्शन मडावी हे मूळचे मूल तालुक्यातील गोवर्धन येथील रहिवासी असून ते सामाजिक व शैक्षणिक चळवळीत नेहमी अग्रेसर असतात. प्राथमिक शिक्षकाने सेट परीक्षा उतीर्ण केल्यामुळे त्यांचे सर्व्र कौतुक होत आहे.