बहीण भावांचे सुयश शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हयातून दुसरी गौरवी चोपराम तरोने

37

महाराष्ट्र स्टेट कौन्सिल ऑफ एक्सामी नेशन पुणेतर्फे आयोजित सन 2020-2021 च्या परीक्षेत मुल येथील सेंट अंनेस हायस्कूल येथील इयत्ता आठवी मधील विद्यार्थिनी गौरवी चोपराम तरोने हिने शहरी सर्वसाधारण प्रवर्गातून जिल्ह्यात दुसरा येण्याचा मान पटकावला आहे.

यासोबतच येथील तिचा भाऊ शाश्वत चोपराम तरोने हा इयत्ता पाचवी मधून उत्तीर्ण होऊन शिष्यवृत्ती साठी पात्र ठरला आहे.

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2021 मध्ये प्रवेशासाठी शाश्वत पात्र होऊन ज. न. वि. तलोधी येथे शिकत आहे.

त्यांनी आपल्या यशाचे श्रेय सर्व शिक्षकवृंद आणि आईवडिलांना दिले आहे.