टाटा मॅजिक अचानक पेटू लागले

40

मूल प्रतिनिधी:- मूल-सिंदेवाही-मूल या मार्गे प्रवासी वाहतुक करणारा टाटा मँजीक (एमएच-३४-डी-२४५५) नेहमी प्रमाणे प्रवासी वाहतुक करून दुपारी ४.४५ वा. चे सुमारास उद्याना समोरील महामार्गाच्या कडेला उभा करून चहा पिण्याकरीता चहा टपरीवर गेला.

जुन्या रेल्वे फाटकालगत निर्माणाधीन असलेल्या उद्याना समोर बंद असलेल्या उभ्या टाटा मॅजिकला अचानक आग लागल्याची घटना आज दुपारी ४.४५ वा. दरम्यान घडली. लागलेल्या आगीत वाहन मालकाचे लाखोचे नुकसान झाले.

दरम्यान बंद असलेल्या टाटा मँजीकमधुन अचानक धुरीचा लोळ निघुन पेटु लागला. बंद असलेले टाटा मँजीक अचानक पेटु लागल्याचे जवळपास असलेल्या नागरीकांना दिसताच मार्गालगत असलेल्या भोजनालयामधुन पाणी आणुन आग विझविण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु अपुऱ्या पाण्याने वाहणाला लागलेली आग विझविण्यात यश आले नाही.

घटनेची माहीती होताच पोलीस कर्मचारी घटनास्थळी हजर झाली. तोवर वाहणाने चांगलाच पेट घेतला होता. काही प्रत्यक्षदर्शीसह पोलीस कर्मचाऱ्यांनीही नगर परीषदेच्या अग्नीशमन वाहना करीता संपर्क साधला. परंतु नगर परीषदेचे अग्नीशमण वाहन दुरूस्ती करीता महीण्याभरा पासुन नागपूर येथे असल्याने नेहमीप्रमाणे आजही आग विझविण्यात नगर परीषदेचे अग्नीशमन वाहन निरूपयोगी ठरले, त्यामूळे उघड्या डोळ्यांनी पेटते वाहण पाहणाऱ्या मंडळीमध्ये नगर प्रशासनाच्या कारभाराविषयी असंतोष दिसुन आला.

नव्वद टक्के वाहन जळाल्यानंतर नगर परीषदेने पाण्याच्या प्रेशरने नाली साफ करायचे जेट पंप वाहन पाठवुन वाहनात धुमसत असलेली आग विझविण्यात आली. घडलेल्या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवहानी झाली नसली तरी वाहन मालक रवि कल्लुरवार यांचे अंदाजे सहा लाखाचेवर नुकसान झाल्याचे सांगण्यात येते.

नगर परीषदेचे अग्नीशमन वाहन लागलीच उपलब्ध झाले असते तर झालेले लाखोचे नुकसान कमी झाले असते. हे माञ विशेष