केळझर, येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी

49

कोरोनाच्या तिस-या लाठेच्या पश्र्वभूमीवर ग्रामीण परिसरात रुग्णांची संख्या वाढत असताना ग्रामीण भागात विविध आरोग्य तपासणी करण्याच्या दुष्टींने जि, पं. प्रा. शाळा केळझर, येथे दि.२३/०१/२०२२ सकाळी ९.००ते १.०० वा. पर्यंत मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आला. या शिबिराचे उदघाटक मा.डॉ.सौ.अभिलाषा राकेश गावतुरे सुप्रसिध्द बालरोग तज्ञ चंद्रपूर, त्याच -प्रमाणे सहउदघाटक मा. डॉ . सुनील मालोजवार, अस्थीरोग तज्ञ व स्पाईन सर्जन चंद्रपूर, प्रमुख उपस्थितीत

डॉ.राकेश गावतुरे प्रसिध्द pathologists चंद्रपूर, डॉ. अनुप वासाडे मधुमेह ह्दयरोग तज्ञ चंद्रपूर, डॉ. आशिष पोडे कान, नाक, घसा, तज्ञ चंद्रपूर, डॉ.रितेश सोंडवले स्त्री रोग तज्ञ चंद्रपूर,डॉ.रुपेश सोंडवले शल्यचिकित्सक चंद्रपूर, डॉ. राकेश वनकर जनरल फिजीशीयन चंद्रपूर, डॉ.सिराज खान जनरल फिजीशीयन चंद्रपूर, डॉ.दीपक जोगदंड जनरल फिजीशीयन चंद्रपूर, डॉ.पराग जाधव जनरल फिजीशीयन चंद्रपूर, डॉ. वैभव पडचेलवार जनरल फिजीशीयन चंद्रपूर,डॉ तीरत उराडे जनरल फिजीशीयन मुल, डॉ.राजू ताटेवार आयुर्वेद तज्ञ चंद्रपूर, मा. प्रशांत तावाडे असिस्टट (lab) चंद्रपूर,सौ. सोनाली लोनबले सहाय्यक नर्स केळझर.

यांच्या उपस्थितीत आरोग्य तपासणी शिबीर पार पडले.

सर्व डॉ.निशुल्क सेवा देऊन एक प्रकारचा सेवाभाव दर्शवला. त्यामध्ये सुगर, B. P.रक्त तपासणी, युरीन तपासणी व इतर हि दुर्धर आजारावर इलाज करून मोफत औषधी उपचार केला. व रूग्णामध्ये आरोग्याच्या बाबतीत जागृत राहण्याचा सल्ला दिला. सुमारे ४५० महिला व पुरुष रूग्णाची तपासणी करण्यात आली. हे शिबीर यशस्वी होण्याकरीता डॉ. राकेश गावतुरे यांचे मार्गदर्शन लाभले.

या शिबिराचे मुख्य संयोजक साईनाथ दशरथ लोनबले त्याचप्रमाणे सौ. सोनाली साईनाथ लोनबले, केळझर येथील सार्वजनिक वाचनालयातील सर्व विध्यार्थी,तसेच ग्रामपंचायत केळझर चे सरपंच मा. काजू खोब्रागडे, तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य , अंगनवाडी सेविका सौ. बयाबाई लाकडे सौ.नीता मराठे, आशा वर्कर, संचालन साहिल सोनुले, आभार प्रदर्शन मा. साईनाथ दशरथ लोनबले यांनी केले. व गावातील युवकांनी सहकार्य केले.