आर्थिक उन्नतीसाठी नावीन्यपूर्ण शेती काळाची गरज.

40

 

मुल(प्रती)

प्रजासत्ताक दिनाच्या शुभमुहूर्तावर तालुक्यातील ग्रो पुअर शेतकरी प्रोडूसर कंपनी लिमिटेड मुल तथा शेतकरी यांच्यात शेती, उद्योग संबंधात द्विपक्षीय करारनामा करण्यात आला. यावेळी तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी,महिला समूह गट उपस्थित होते.

परंपरागत शेती शेतकऱ्याला परवडण्यासारखी नाही. त्यामुळे शेतीतून आपली आर्थिक उन्नती करायची असेल तर परंपरागत शेती सोबत नाविन्यपूर्ण शेती करणे काळाची गरज आहे. ग्रोपुअर फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड तर्फे हे शेतकऱ्यांना शक्य होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कंपनीकडून देण्यात येणारे गवत शेतात लागवड केल्यास अधिक उत्पन्न मिळेल व रोजगार उपलब्ध होईल असे मत अध्यक्षस्थानावरून पत्रकार प्रकाश चलाख यांनी व्यक्त केले.

कंपनी व्यवस्थापक श्रीवास्तव यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांना कंपनीबद्दल विस्तृत माहिती देत कंपनीकडून शेतात गवतापासून रोजगार उपलब्ध करून देण्याची संधी देण्यात येत असल्याची माहिती दिली. गेल्या दोन वर्षापासून कंपनी तालुक्यात शेतकऱ्यांना गवत लागवडी बाबत अधिक माहिती देत आहेत. अनेक शेतकरी आपल्या शेतात गवत लागवड करण्याकरिता कंपनीसोबत जोडलेले आहेत. कमी खर्चात अधिक लागवड करून जास्त नफा कमावणे, आपली आर्थिक उन्नती करणे हा कंपनीचा उद्देश असल्याचे श्रीवास्तव यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमाप्रसंगी मंचावर कंपनी व्यवस्थापक धोडरे, प्रवीण मोहुरले, रोहित तेलंग, ढोंगे, उपस्थित होते. कार्यक्रमाला तालुक्यातील गांगलवाडी, भगवानपुर, दुगाळा, सिंतला, दहेगाव येथील बहुसंख्य शेतकरी, महिला समूह गट उपस्थित होते.