सावधान ! मुल शहरात कोरोना वाढतोय :आजचा पाॅझिटिव्ह 28 मुख्याधिकारी सिध्दार्थ मेश्राम

45

मूल:- जानेवारी महिन्याच्या सुरूवातीपासून कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत असून ,तिस-या आठवडयात कोरोना रूग्णांची  व्यक्तीचा अहवाल पाॅझिटिव्ह आला.रविवार आजचा आकडा28  नव्याने रूग्णांची भर पडली.कोरोना रूग्णांची संख्या वाढत असली तरी नागरिक मात्र बिनधास्त असल्याचे दिसत आहे. कोरोनाच्या दुस-या लाटेनंतर रूग्णांची संख्या निंरक झाली होती.लसीकरण आणि जनजागृतीमूळे रूग्णांची संख्या नियंत्रणात हेाती.मात्र कोरोनाची तिसरी लाट सुरू झाली आणि जानेवारी महिन्याच्या सुरूवातीपासून पाॅझिटिव्ह रूग्णाची संख्या वाढायला लागली. असली तरी नागरिक मात्र कोणत्याही नियमांचे पालन करताना दिसत नाहीत.प्रशासनाच्या वतीने वारंवार जनजागृती करण्यात येत आहे. दंडात्मक कारवाईही केली जाते. परंतु नागरीक मात्र विनामास्क भटकंती करताना दिसत आहेत.

नागरिकांना विनंती 🙏🏼
आज दिनांक २३/१/२०२२ रोजी एकाच दिवसात मुल शहरात २८ रुग्ण पॉजिटिव्ह आढळून आले आहेत.
पुर्वी लक्षण नसलेल्या रुग्णांची संख्या जास्त नव्हती. मात्र आता लक्षण असलेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. हळूहळू रुग्ण गंभिर होण्याची शक्यता वाढेल. मग रुग्ण वाढल्याने वेळेवर बेड न सापडणे वैगेरे प्रश्न निर्माण होतील.

सद्या स्वत:ला व शहराला सावरण्याची संधी आहे. कृपया प्रथम आपले लसिकरण तातडीने पुर्ण करुन घ्या. (लसिकरण केल्यास रुग्ण गंभिर होण्याची शक्यता कमी आहे)  काही होत नाही ही मानसिकता सोडुन चांगल्या मास्क चा वापर करा. सामाजिक अंतर पाळा.

आपली सुरक्षा आपल्या हाती.

आपला
सिध्दार्थ मेश्राम
मुख्याधिकारी
नगर परिषद मुल

जिल्ह्यात रविवारी 268 कोरोनामुक्त, 469 बाधित तर 1 मृत्यु

Ø ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या 3575

चंद्रपूर, दि. 23 जानेवारी : कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येत लगातार वाढ होत असुन गत 24 तासात जिल्ह्यात 268 जणांनी कोरोनावर मात केली असून त्या रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 469 नवीन रुग्ण बाधीत झाले आहे. तर रविवारी जिल्ह्यात एका बाधिताचा मृत्यू झाला आहे.

आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात 182, चंद्रपूर 13, बल्लारपूर 37, भद्रावती 64, ब्रह्मपुरी 16, नागभीड 6, सिंदेवाही 7, मुल 15, सावली 6, पोंभूर्णा 11, गोंडपिपरी 8,  राजुरा 9, चिमूर 40, वरोरा 37, कोरपना 10, तर जिवती येथे 8 रुग्ण आढळून आले असून इतर ठिकाणी बाधित रुग्णांची संख्या शून्य आहे. आज मृत झालेल्यामध्ये चंद्रपूर येथील एका महिलेचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 94 हजार 307  वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 88 हजार 184 झाली आहे. सध्या 3575 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 8 लाख 34 हजार 78 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 7 लाख 38 हजार 106 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1548 बाधितांचे मृत्यू झाले आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.