‘गोपीनाथ मुंडे’ शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत

35

          शेती व्यवसाय करताना होणारे अपघात, वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक बसणे आदी आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात तसेच अन्य कोणत्याही अपघाती कारणांमुळे शेतकरी तसेच शेतकरी कुटुंबातील कोणत्याही एका व्यक्तीचे मृत्यू ओढवल्यास किंवा कायमचे अपंगत्व आल्यास संबंधित शेतक-्याच्या वारसदारांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत शासनाच्या कृषी विभागामार्फत मदत केली जाते. यासाठी सातबाराधारक शेतकरी तसेच कुटुंबातील कोणताही एक व्यक्ती पात्र आहे.

          गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत शेतकरयांना दोन लाख रूपये रक्कमे पर्यंत विमा मदत मिळते. अपघात होणार्या शेतकरयांचा विमा प्रस्ताव ९० दिवसापर्यंत केव्हाही विमा कंपनीकडे कृषी विभागामार्फत सादर करता येईल. विम्याचा मिळविण्यासाठी शेतकरी १० ते ७५ या लाभ वयोगटातील सातबाराधारक किंवा कुटुंबातील कोणत्याही एका व्यक्तीच्या नावे शेत जमीन असणे आवश्यक आहे.

शेतकरयांनी अर्जाच्या नमुन्यासाठी गावातील कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक वयोगटातील सातबाराधारक किंवा कुटुंबातील कोणत्याही एका व्यक्तीच्या नावे शेत जमीन असणे आवश्यक आहे. शेतकरयांनी अर्जाच्या नमुन्यासाठी गावातील कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षककिंवा तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. अपघाताचा प्रसंग घडल्यास शेतकरी किंवा त्याच्या वारसदाराने तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे परिपूर्ण प्रस्ताव सादर करावा.

      त्यानंतर जिल्हा अधीक्षक  कृषी अधिकारी यांच्या कार्यालयामार्फत शासनाचे विमा सल्लागार प्राथमिक छाननी करून प्रस्ताव विमा कंपनीकडे मंजुरीसाठी पाठवितात. अधिक माहितीसाठी शेतकरयांनी कृषी  कार्यालयाशी संपर्क साधावा. 

विम्यासाठी लागणारी कागदपत्रे सातबारा, गाव नमुना क्रमांक सहा-ड, घटनास्थळाचा पोलीस पंचनामा, वयाचा दाखला (पॅन कार्ड, मतदान कार्ड, शाळेचा दाखला), अपघात झाल्यास पोलिसांचा 'एफआयआर अत्यावश्यक, अथवा फेरफार नोंदीबाबतचे प्रमाणपत्र, गाव नमुना क्रमांक सहा-क अथवा वारस नोंदीबाबतचे प्रमाणपत्र हे मूळ स्वरूपात द्यावे लागते. तसेच प्रतिज्ञापत्र (अँफेडिव्हिट) मूळ द्यावे लागते. मात्र वयाचा पुरावा, शिधापत्रिका, मृत्यू दाखला, अपंगत्वाचा दाखला, एफआयआर, घटनास्थळ पंचनामा आणि अन्य कागदपत्रे छायांकित (झेरॉक्स ) स्वरूपात व स्वत:च्या सहीने साक्षांकित करुन द्यावी. शेतकर्याचा जन्माचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, ग्रामपंचायतीचे प्रमाणपत्र, आधारकार्ड, पॅनकार्ड, निवडणूक कार्ड यापेकी कोणताही एक पुरावा चालतो. काहीच न मिळाल्यास एक शपथपत्र दिले तरी ग्राह्य धरले जाते.

वारसांना कसा व कधी मिळेल योजनेचा लाभ विमा संरक्षणात रस्ता किंवा रेल्वे अपघात, पाण्यात बुडुन मृत्यू, जंतुनाशके हाताळताना अथवा अन्य कारणामुळे विषबाधा, विजेचा धक्का बसल्यामुळे झालेला अपघात, वीज़ पडून मृत्यू, खून, उंचावरून पडून झालेला अपघात, सर्पदेश व विचुदेश, नक्षलवाद्याकडून झालेल्या हत्या, हिस्त्र जनावरांनी खाल्ल्यामुळे किया साप, विंचू चावल्यामळे जखमी होणे किंवा मृत्यू, दंगल आणि अन्य कोणत्याही अपघातांचा समावेश करण्यात आला आहे. शेतकरयाचा अपघाती मृत्यू किंवा अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन अवयव निकामी होणे यासाठी दोन लाख रुपये नुकसानभरपाई देण्यात येणार आहे. तर अपघातामुळे एक डोळा व एक अवयव निकामी झाल्यास एक लाख रुपये नुकसानभरपाई देण्यात येणार आहे.

कोणाला या योजनेचा लाभ मिळणार नाही :-  नैसर्गिक मृत्यू, विमा कालावधीपूर्वीचे अपंगत्व, आत्महत्येचा प्रयत्न, आत्महत्या किवा ज्ञाणीवपूर्वक स्वतः ला जखमी करून घेणे, गुन्ह्याच्या उद्देशाने कायद्याचे उल्लंघन करताना झालेला अपघात, अमली पदार्थांच्या अमलाखाली असताना झालेला अपघात, भ्रमिष्टपणा, बाळंतपणातील मृत्यू, शरीरांतर्गत रक्तस्त्राव, मोटार शर्यतीतील अपघात, युद्ध, सैन्यातील नोकरी, जवळच्या लाभधारकाकडून खून या बाबींचा विमा संरक्षणात समावेश होत नाही. किंवा यामुळे गोपीनाथ मुंडै शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ मिळणार नाही.