शासनातर्फ राबविल्या जातात योजना निराधार आहात? या योजनेचा लाभ घेतला का?

41

अस्थिव्यंग व दूर्धर आजाराने त्रस्त, तसेच निराधार वयोवृद्धांसाठी राज्य शासनातर्फे संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय तृद्धपकाळ निवृत्ती योजना अशा योजना राबविल्या जातात. निराधार महिला विधवा, ६५ वर्षांवर वृद्ध किंवा अस्थिव्यंग, अंध, मूकबधिर, मतिमंद वर्गातील महिला-पुरुष,क्षयरोग, पक्षाघात, एचआयव्ही, एड्स, कर्करोग, कुष्ठरोग असल्याने स्वत:चा चरितार्थ चालू शकण्यास असमर्थ असणारे, शेतमजूर महिला, तसेच १८ वर्षांखालील अनाथ मुले अशा निराधारांसाठी शासनातर्फे ही योजना राबविली जाते. या योजनेंतर्गत दर महिन्याला आपल्या खात्यात एक ठरावीक रक्कम जमा होते. तेव्हा आपणही निराधार असाल तर या योजनेसाठी आताच अर्ज करा व त्याचा लाभ घ्या, 

वार्षिक उत्पन्न २१ हजारांच्या आत हवे या योजनेसाठी पात्र उमेदवारांचे वार्षिक उत्पन्न हे २१ हजार रुपयांच्या आत असणे आवश्यक आहे. यासाठी वयाचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, अपंग असल्यास त्याचे प्रमाणपत्र, दुर्धर आजार असल्यास त्याचे प्रमाणपत्र, जिल्हा शल्यचिकित्सक किंवा शासकीय रुग्णालयाचे वेद्यकीय अधीक्षक यांनी दिलेला दाखला, आदी अर्ज सोबत जोडणे आवश्यक आहे.

या योजनेंतर्गत दर महिन्याला हजार रुपये आपल्या खात्यात जमा होतात. एक हजार रुपये महिन्याला मिळतात ही योजना राज्य व केंद्र सरकार यांची मिळून आहे.