अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या

23

मूल :
तालुक्यातील मारोडा येथील अल्प भुधारक शेतकरी नामदेव भदुजी मानकर (६७) ह्याने शेतातील झाडाला गळफास लावुन आत्महत्या केली. मिळालेल्या माहीतीनुसार शौचास जात असल्याचे सांगुन मृतक नामदेव पहाटे ५ वा. चे सुमारास गांवापासुन अंदाजे ३ कि.मी. दुर असलेल्या सोमनाथ लगतच्या शेतात गेला.

दरम्यान सकाळी ७ वा. चे सुमारास नामदेवच्या शेतालगत असलेल्या बेरशेट्टीवार यांचे शेतात मोरेश्वर वैरागडे नामक मजुर गेला तेव्हा त्याला शेतातील आंब्याच्या झाडाच्या फांदीला नामदेव गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसुन आला. लागलीच त्याने सदर प्रकार नामदेवच्या कुटूंबियास सांगीतल्या नंतर सदर घटनेची माहीती मूल पोलीसांना देण्यात आली,

घटनेची नोंद घेवुन पुढील तपास केला तेव्हा नामदेव मानकर याच्या कब्जात असलेली अंदाजे २ एकर अतीक्रमीत शेती काही दोन महीण्यांपूर्वी वनविभागाने ताब्यात घेतल्याने मृतक नामदेव अस्वस्थ होता.

ह्याच अस्वस्थेतुन नामदेवने स्वताःचे जीवन संपविले असावे, असे बोलल्या जात आहे. मृतक नामदेवचे पश्चात पत्नी, चार मूल आणि तीन भाऊ आहेत.