पशुसंवर्धन विभगाच्या योजना कागदपत्रे अपलोड करा 12 जानेवारी ते 16 जानेवारी 2022

71

नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच्या लेखामध्ये शेतकऱ्यांसाठी व शेतमजुरांसाठी. अन्य लाभार्थ्यांसाठी राबवण्यात येत असलेल्या पशुसंवर्धन विभागा अंतर्गत विविध योजनेचा जवळपास 7 योजनेच्या कागदपत्रे अपलोड करण्यासंदर्भातील महत्वपूर्ण अपडेट आलेलं आहे.

 

आपण शेळी पालन कुकुटपालन तसेच दुधाळ गाई/म्हशी वाटप या योजनेसाठी अर्ज केला असेल. तर आपल्याला कागदपत्रे अपलोड करण्याची शेवटची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आपली निवड झाली असेल किंवा आपल्याला आपली निवड झाली की नाही. कागदपत्रे अपलोड कशी करावी त्या संदर्भातील संपूर्ण माहिती आजच्या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत.

पशुसंवर्धन विभाग योजना कागदपत्रे कशी करावी 

राज्य सरकारने म्हणजेच पशुसंवर्धन विभाग अंतर्गत विविध योजना ऑनलाईन पद्धतीने लाभार्थ्यांचे सुरू केल्या होत्या. त्या लाभार्थ्यांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये अर्ज लाभार्थ्यांनी केले होते आणि याच अनुषंगाने राज्य शासनाने यांची कागदपत्रे अपलोड करण्यासाठी प्रोसेस आहे ही सुरू केली आहे.

लाभार्थ्यांना सुचित करण्यात येते की कागदपत्रे अपलोड करण्याची तारीख 12 जानेवारी ते 16 जानेवारी 2022 ची शेवटची तारीख असणार आहे. 16 जानेवारी 2022 रात्री 12 पर्यंत आपण कागदपत्रे अपलोड करण्याची शेवटची मुदत कालावधी आहे. आपली निवड झाली असेल तर आपल्याला 12 जानेवारीपासून ते 16 जानेवारी पर्यंत कागदपत्रे अपलोड करायचे आहेत.

कागदपत्र अपलोड करण्यापुर्वी महत्वाच्या सूचना .


1. महत्वाची सूचना – कागदपत्र अपलोड क्षमता १०० के.बी. पर्यंत असावी, “jpg, JPG, jpeg, JPEG, png, PNG” या प्रकाराचे निवडावे या प्रमाणात असावी.

2. अर्जं प्रतीक्षाधीन ठरल्यानंतरच कागदपत्र विहीत वेळेतच कागदपत्रे अपलोड करता येतील

3. अर्जदार नोंदणीच्या वेळेस देण्यात आलेल्या आधारकार्ड नंबर व पासवर्ड भरून लॉगिन करा या बटन वर क्लिक करणे.

4. “निवडा” या बटन वर क्लिक करून कागदपत्र अपलोड करावीत

5. कागदपत्र अपलोड करताना फाइल निवडून घ्यावी व save करण्यापूर्वी शेजारी दिलेल्या विंडो मध्ये अपलोड केलेल्या कागदपत्राची खात्री करून नंतरच save करावी.

6. कागदपत्र जतन करण्यापुर्वी ते योग्य आहेत याची खात्री करून घ्यावी.

7. योजनेच्या लाभार्थी निवडीच्या निकषनुसार, अपलोड केलेल्या कागदपत्रा व्यतिरिक्त अनुषगिक अतिरिक्त कागदपत्राची मागणी पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिति / संबधित पशूसवर्धन अधिकारी यांनी केल्यास ती कागदपत्रे उपलब्ध करून देणे लाभार्थ्यास बंधनकारक आहे.