सामाजिक जाणीव जोपासत वनराई बंधाऱ्याचे बांधकाम. फार्मर रायडर्स तथा युवकांचा स्तुत्य उपक्रम.

35

मूल(प्रती)   तालुक्यातील ग्राम पंचायत कार्यालय चिचाळा येथील फार्मर रायडर्स समूह तथा इत्तर सुशिक्षीत युवकांतर्फे जवळच्या उमा नदीवर वनराई बंधारा बांधण्यात आला. सामाजिक जाणीव जोपासत युवकांततर्फे हे काम करण्यात आले.

उन्हाळ्यातील पिण्याच्या पाण्याची टंचाई, पाण्याचे महत्व, भविष्यात पाण्याची टंचाई भासू नये, पिण्याचे पाणी उन्हाळ्यात पुरावे, मुक्या जनावरांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, परिसरातील जलपातळी वाढावी, पर्यावरणाचे संरक्षण व्हावे याकरिता सामाजिक जाणीवेतून चिचाळा लगत वाहणाऱ्या उमा नदीवरील पाणी पुरवठा योजनेच्या टाकीजवळ सामूहिक श्रमदानातून दोनशे पोत्यांचा वनराई बांधत चिचाळा वासीयांना सामाजिक बांधिलकीचा मंत्र दिला.

यावेळी सरपंच जास्मिताताई लेनगुरे, उपसरपंच सुरज चलाख, ग्रा. पं. सदस्य रेखा निकेसार, वर्षा लेनगुरे, सोनी लेनगुरे, ग्रा कर्मचारी विजय केळझरकर, मनोज कोतंमवार, विलास लेनगुरे, अनुप लेनगुरे, एफ. आर. सी समूहाचे युवक शुभम बलगेवार, वैभव लेनगुरे, गुणेश लेनगुरे, गणेश उडाण, रुपेश चलाख, रुपेश गुरनुले, अंकुश वैरागडे, राकेश गुडलावार, आकाश दहिवले, बलवंत चलाख, राकेश चलाख, सार्थक जांबुलवार, गणेश लेनगुरे, यश लेनगुरे, शुभम गुरनुले, तथा गावातील बहुसंख्य युवक उपस्थित होते.