स्वामी विकेकानंद विद्यालयाचे शिक्षक अरुण गाजेवार यांचे दुःखद निधन                         

31

मूल  :-स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था मूल द्वारा संचालित स्वामी विवेकानंद विद्यामंदिर मूल येथील ज्येष्ठ सहाय्यक शिक्षक तथा प्रगती माध्यमिक शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतसंस्था मूल चे विद्यमान अध्यक्ष अरुण गाजेवार यांचे दिनांक 10 जानेवारी 2022 ला  रात्री 10.30  वाजता  हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.

मृत्युसमयी ते 50 वर्षाचे होते. त्यांच्यावर मुल येथील उमा नदीच्या तीरावर  अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शोकसभा घेऊन त्यांना शोक संवेदना अर्पण करण्यात आली.

स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष महाराष्ट्र राज्याच्या माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांनी त्यांच्याप्रती शोकसंवेदना व्यक्त केल्या.

त्यांच्या मृत्यूपश्चात एक भाऊ, पत्नी, दोन मुली, एक मुलगा व मोठा आप्तपरिवार आहे.