श्रमिक नगरातील घरांचे अतिवृष्टीने नुकसान आर्थिक मदतीची महिलांची मागणी

42

मूल. :- पावसाळ्यात पावसाचे पाणी घरात घुसून वॉर्ड नंबर आठमधील श्रमिकनगर येथील घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. घरांचे नुकसान झाल्याने नागरिकांना राहण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाकडून शासकीय नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी श्रमिकनगर येथील महिलांनी तहसीलदार यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

श्रमिकनगर येथील महिला गरीब कुटुंबातील आहेत. कुटुंबांचा मुख्य व्यवसाय मजुरी आहे. मजुरीनिमित्त येथील कुटुंब कामानिमित्त बाहेर असतात. अतिवृष्टीमुळे झालेल्या घरांच्या नुकसानीचा सर्वे करण्यात आला. 

परंतु या शासकीय सर्वेत काही घरांची नोंद घेण्यात आली नाही. त्यामुळे बरेच कुटुंब शासकीय मदतीपासून वंचित आहेत. पावसामुळे आमच्या घराची मोठ्या होऊनसुद्धा आम्हाला शासकीय नुकसान भरपाई मिळाली नाही. तरी शासनाने आमची नावे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या लाभार्थ्यांच्या यादीत समाविष्ट आम्हाला झालेल्या नुकसानीची शासकीय मदत देण्यात यावी.

शी विनंती श्रमिक नगर येथील वैशाली मुत्यालवार, रेखा शेंडे, वंदना मुत्यालवार, कुंदा कोल्हे, मीरा कोल्हे, शेवंता शेंडे इत्यादी महिलांनी शासनाकडे केली आहे.