नागरिकांचे आभार मानत दिला निरोप. मुल न.प.नराराध्यक्षा प्रा.रत्नमाला भोयर

39

आज मुल नगरपरिषदच्या नगराध्याक्षांचा कार्यकाल संपलेला असून ‘भारमूक्त‘ झाले असे म्हणून नागरिकांचे आभार मानत दिला निरोप.
28 नोव्हेंबर 2016 ला थेट निवडणूकीव्दारे निवडून आलेल्या प्रा.रत्नमालाभोयर नगराध्यक्षपदी 31 डिसेंबरला पदभार स्विकारला.आज निरोप देतांना त्यांनी सुप्रसिध्द कवी ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त सुमित्रानंदन पंत यांच्याओळी म्हणत.मानले नागरिकांचे आभार.
                                                                  यह साॅंझ उषा का आॅंगन
                                                                 आर्लिगन विरह मिलन का
                                                                   चि-हास अश्रूमय आनन
                                                                  रे इस मानवजीवन का
वरील ओळींचा उल्लेख करत नगराध्यक्षांनी आपल्या कार्यकाला मध्ये अनेक  विकासाची कामे झालेली असून सन्माननीय मा. सुधीरभाऊ मुनगंटीवार ,विधानसभा सदस्य, लोकलेखा समिती प्रमूख यांच्या मार्गदर्शनाखाली शहराच्या विकासास प्राधान्य दिले. अनेक लोकोपयोगी विकासाची कामे केलीत. रस्ते, नाली, पाणी, वीज यासोबतच रिक्रेशन सेंटर, योगा हाॅल,क्रिडा संकूल, जलतरण केंद्र, जीम, अभ्यासिका, शाळेची भव्य इमारत, चौकातील फवारे, सौंदर्यीकरण पुतळे,ग्रिन जीम ऑरो मशीन वाॅटर, रस्त्यांना नावे, तलावाचे सौंदर्यीकरण, इ..कामे पुर्ण करू शकली. घर नाही,,, जागा नाही ,,,,त्याला घरकूलासाठी जागा हस्तांतरित करणे, बचत गटाच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरणासाठी सभागृह, शहीद स्मृती स्थळ, बसस्टाॅपजवळील तलावाचे सौंदयीकरण इ.ठराव घेतले गेले.

      मूल शहरातील नागरिकांनी मोठया प्रमाणात मते देवून मला निवडूण आणले.त्यांच्या पाठिंब्यामूळे व सन्माननीय सुधीरभाऊंच्या आर्शिवादाने पाच वर्षे पूर्ण केले.मूल वासिय जनतेच्या सहकार्याने व नगरसेविका -नगरसेवक,कर्मचारी यांच्यासर्वांच्या सहकार्यांने पाच वर्षाचा काळ संपून आज कार्यकाळ संपला याचीमनात हळळळ तसेच भारमूक्त झाल्याचा आनंदही वाटत आहे असे म्हणत  सर्वांचे आभार,मानत महात्मा गांधीच्या पुतळयाला हार घालून दिपप्रज्वलीतकरून मूल शहराचा उत्तमोत्तम विकास होत जावा असे मनोगत व्यक्त करत  निरोप घेतला.