Aadhaar Card | घरबसल्या ऑनलाइन व्हेरिफाय होईल तुमचे आधार कार्ड, जाणून घ्या काय आहे ‘स्टेप बाय स्टेप’ प्रोसेस

40

सध्या आधार कार्ड (Aadhaar Card) आपल्यासाठी सर्वात महत्वाचे कागदपत्र आहे. ते सुरक्षित ठेवणे अतिशय आवश्यक आहे. अनेकदा असे होते की आधार कार्ड हरवते आणि एखाद्या अज्ञात व्यक्तीद्वारे त्याचा चुकीचा वापर होऊ शकतो, ज्यामुळे आपल्याला अडचणींचा सामना करावा लागतो.

यापासून वाचण्यासाठी ऑनलाइन किंवा ऑफलाइन आधार व्हेरिफाय करणे आवश्यक आहे (Aadhaar online or offline verification).

आधार कार्डला संचालित करणारी संस्था UIDAI नुसार, कोणतेही आधार ऑनलाइन किंवा ऑफलाइन पडताळणीस पात्र आहे. ऑफलाइन पडताळणीसाठी, ई-आधार (e-Aadhaar) किंवा आधार पत्र किंवा आधार पीव्हीसीकार्ड (Aadhaar PVC card) वर क्यूआर कोड स्कॅन करा.

ऑनलाइन पडताळणी करण्यासाठी, https://resident.uidai.gov.in/verify लिंकवर जाऊन 12 अंकाचा आधार नंबर नोंदवा, हे तुम्ही एमआधार अ‍ॅपचा वापर करून करूशकता.

ऑनलाइन किंवा ऑफलाइन आधार व्हेरिफाय करू शकता. ई-आधार किंवा आधार पत्र किंवा आधार PVC कार्डवर क्यूआर कोड स्कॅन करा. किंवा वेबसाइटवर 12 अंकाचा आधार नंबर टाका आणि व्हेरिफाय करा. कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी टोल फ्री नंबर 1947 वर कॉल करा किंवा [email protected] वर मेल करा. (Aadhaar Card)

काय आहे स्टेप बाय स्टेप प्रोसेस
आधार कार्ड ऑनलाइन पद्धतीने व्हेरिफाय करण्यासाठी सर्वप्रथम https://resident.uidai.gov.in/verify वर जावे लागेल.

येथे 12 अंकाचा आधार नंबर नोंदवा. यानंतर कॅप्चा व्हेरिफिकेशन ऑप्शनवर जाऊन कॅप्चा कोड नोंदवून प्रोसीड टू व्हेरिफाय पर्यायावर क्लिक करा.
इतके केल्यानंतर आधार व्हेरिफाय होईल.