मूल येथे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी जयंतीनिमित्य असंघटीत कामगारांना ई-श्रम कार्ड वितरण

29

मूल :- भारतीय जनता पार्टी मूल शहराच्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहून माल्यार्पण करण्यात आले.
यावेळी भाजपा मूल शहर अध्यक्ष प्रभाकर भोयर यांनी श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर प्रकाश टाकून उपस्थितांना मार्गदर्शन केलेण् माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त्याने मूल येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात शासनाने असंघटित कामगारंाना सामाजिक सुरक्षा प्रदानकरण्यासाठी अधिनियम तयार करून अमलात आणण्याच्या दुष्टीने ई.श्रमपोर्टलच्या माध्यमातून नोदंणी करण्याचे कार्य युध्दपातळीवर सुरू झाले आहेण्बिडी कामगारएमासेमारएसुतार कामगारएभाजी आणि फळ विक्रेतेएवृत्तपत्र विक्रेतेवीटभटी कामगार यासारख्या विविध व्यवसाय गटांतील असंघटित क्षेत्रात
काम करणा.या कामगारांना सामाजिक सुरक्षा पुरविण्यात येणार आहे.त्याकरिता असंघटित कामगारांसाठी डाटा ई.श्रम पोर्टलच्या माध्यमातूनएकत्रित केला जात आहे.   

                                                                                                                                                                                 यावेळी कामगारांना ई . श्रम कार्ड वितरित करण्यात आले . यावेळी मुल शहर भाजपा अधक्ष प्रभाकर भोयर, नगर परिषद मुल चे उपाध्यक्ष नंदु रणदिवे, नगरसेवक मिलींद खोबरागडे,नगरसेवक प्रशांत लाडवे, अजय गोगुलवार, अनिल साखरकर,प्रशांत बोबाटे, ओबीसी नेते राकेश ठाकरे, रिंकु मांदाडे, प्रमोद कोकुलवार, दादाजी येरणे , बबन गुंडावार, आशुतोष सादमवार, कल्पना पोलोजवार,तरूण भारत चे तालुका प्रतिनिधी व ओबीसी नेते युवराज चावरे, व बहुसंख्य भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.