मूल येथील नामांकित नवमारत कन्या विद्यालय विद्यार्थिनींनी क्षेत्रभेटी

31

अंतर्गत नगर परिषदेला भेट देऊन नगर परिषदेचे कार्य समजून घेतले.
यावेळी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा प्रा. रत्नमालाताई भोयर, मुख्याधिकारी सिद्धार्थ मेश्राम, उपाध्यक्ष नंदू रणदिवे, तुषार शिंदे साहेब, सभापती प्रशांत समर्थ, नगरसेवक महेंद्र करकाळे विनोद कांमडी यांनी विद्यार्थिनींना नगर परिषदेचे कार्य, घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छता या संदर्भात मार्गदर्शन केले. नगरपरिषदेच्या वतीने विद्यार्थिनींना यावेळी खाऊ देण्यात आले.

 

 

नवभारत कन्या विद्यालयाचे मुख्याध्यापिका सौ मंगला सुंकरवार, पर्यवेक्षक सुधाकर पुराम यांचे मार्गदर्शनाखाली विद्यालयाचे शिक्षक विजय सिद्धावार, शैलेश देवाडे सर, कार्तिक नंदुरकर, उज्वला चहांदे अर्चना बेलसरे राकेश नखाते सहभागी झाले. यावेळी कार्यक्रमाचे संचालन आणि आभार प्रदर्शन अशोक येरमे यांनी केले