संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान तथा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत मुल तालुक्यांमध्ये कोसंबी गावाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.

48

प्ंाचायत समिती मूलच्या वतीने संत गाडगेबाबा  ग््रााम स्वच्छता अभियान तथा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा   प्ंाचायत समितीच्या सभागृहात नुकताच पार पाडला.यावेळी जिल्हा परिषद क्षेत्रातून कोसंबी ग्रामपंचायत  प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला.
याप्रसंगी या कार्यक्रमाचे अध्यक्ष महोदया सौ वर्षाताई लोनबले पं स. सदस्या तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक सुनील कारडवार सर, प्रभारी गटविकास अधिकारी पं स.मुल,जिवन प्रधान विस्तार अधिकारी पं स.मुल. वैद्य सर आरोग्य विस्तार अधिकारी, नरेंद्र पेटकर सर कृषी विस्तार अधिकारी स्वछ भारत मिशनचे
हर्षवर्धन वरभे,सचिन येरमलवार आणि मुल तालुक्यातील सर्व ग्रा.पं चे  सन्माननीय सरपंच आणि उपसरपंच , ग्रामसेवक या कार्यक्रमाला उपस्थित होते.