जि.प.अंतर्गत असलेल्या अनुकंपा धारकांसाठी कॅम्पचे आयोजन

25

चंद्रपूर दि.20 डिसेंबर: जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत असलेल्या अनुकंपा धारकांसाठी कॅम्प दि. 21 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता कै. मा.सां. कन्नमवार सभागृह, जिल्हा परिषद, चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आला आहे. सुरवातीला जिल्हा परिषद अंतर्गत अनुकंपा धारकांचा मेळावा प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह येथे आयोजित करण्यात आला होता.

मात्र, कोरोनाच्या पार्श्वभुमीवर आता फक्त जिल्हा परिषद, चंद्रपूर अंतर्गत सर्व अनुकंपाधारकांसाठी 21 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता कै. मा.सां. कन्नमवार सभागृह, जिल्हा परिषद येथे आयोजन करण्यात आले आहे. नियोजित कॅम्पच्या स्थळात झालेल्या बदलाबाबतची नोंद घ्यावी, संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) श्याम वाखर्डे यांनी केले आहे.