हमीभावाने तुर खरेदी खरेदीसाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन

32

Ø तूर खरेदीसाठी जिल्ह्यात 3 केंद्रे सुरु

चंद्रपूर,दि. 20 डिसेंबर: पणन हंगाम 2021-22 मधील हमीभावाने तूर खरेदी करण्याकरीता शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी दि. 20 डिसेंबर 2021 पासून नोंदणी प्रक्रिया तर दि. 1 जानेवारी 2022 पासून खरेदी प्रक्रिया प्रस्तावित करण्यात आली आहे.

हमीभावाने तूर खरेदी सुरू करण्यापूर्वी शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. या करिता दि. 20 डिसेंबर पासून हमीभावाने तूर खरेदीसाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करावी.

ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी आधार कार्ड, वोटिंग कार्ड शेतीचा सातबारा,

बँक खाते पासबुक इत्यादी

संपुर्ण माहितीसह

कृषी उत्पन्न बाजार समिती वरोरा, कोरपना ता.खरेदी-विक्री सहकारी संस्था

( खरेदी केंद्र राजुरा- गडचांदूर), चंद्रपूर जिल्हा कृषी

औद्योगिक सहकारी संस्था चंद्रपूर (चिमूर)

या खरेदी केंद्रावर जाऊन शेतकऱ्यांनी नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी अनिल गोगीरवार यांनी केले आहे.