चारचाकी वाहन पुलाचा खाली कोसळले; एक मृत्यू तीन गंभीर

23

चंद्रपूर:- भरधाव धावणारे वाहन उडाणपुलाचा खाली कोसळले.या दुर्घटने एकाचा मृत्यू झाला तर तिघे गंभीर जखमीआहेत. ही घटना बाबुपेठ-बल्लारपूर रेल्वे उडाणपुला जवळ चारवाजताच्या दरम्यान घडली. अभिषेक गुप्ता असे मृतकाचे नाव आहे. चंद्रपूर येथून बल्लारपुरकडे निघालेले भरधाव एम एच 34 बिआर 0141 चारचाकी वाहन बाबुपेठ-बल्लारपूर रेल्वे उडाणपुलाचा खाली कोसळले.


या भिषण दुर्घटनेत वाहनातील एका युवकाचा जागीचा मृत्यू झाला.
वाहनातील इतर तीघे गंभीर जखमी आहेत.