सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाकरिता महाराष्ट्र शासनाच्या सर्व प्रकारच्या शिष्यवृत्तीसाठी महाडीबीटी (MAHADBT) पोर्टलवर दि.१४ डिसेंबर २०२१ पासून कार्यान्वीत झाले असून, https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळाचा वापर करुन अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्याकरिता सामाजिक न्याय विभाग व विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध शिष्यवृत्ती / फ्रीशीप योजनांकरिता विद्यार्थ्यांनी आपले ऑनलाईन अर्ज नोंदणीकृत करुन हा अर्ज आपल्या संबंधित महाविद्यालयाकडून तपासून व पडताळणी करुन महाविद्यालयांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग यांचेकडे मान्यतेस्तव सादर करावा.
- भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती
- मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क
- व्यावसायिक पाठ्यक्रमात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यावेतन योजना
- राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती
- शालांत परिक्षोत्तर(मेट्रीकोत्तर) शिक्षण घेणाऱ्या अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याची योजना
- अनुसुचित जाती प्रवर्गातील विदयार्थ्यांसाठी व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपुर्ती योजना
तसेच सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षातील अर्ज सादर करणे व नूतनीकरण करणेसाठी ३१ जानेवारी, २०२२ ही अंतिम तारीख देण्यात आलेली असून या तारखेत कोणतीही वाढ करण्यात येणार नाही.
आपल सरकार डीबीटी नोंदणी 2022 साठी स्टेप बाय स्टेप प्रक्रिया
पहिल्या पद्धतीनुसार विद्यार्थी खाली नमूद केलेल्या कोणत्याही दोन पद्धतींचा अवलंब करुन महाडीबीटी वर नोंदणी करू शकतातः
आधार आधारित नोंदणी
आधार नसलेली नोंदणी
- आपल सरकार डीबीटी किंवा महाडीबीटी लॉगिन पोर्टलवर अधिकृत भेट द्या
- ‘नवीन अर्जदार नोंदणी’ शीर्षक असलेल्या टॅबवर क्लिक करा.
- अर्जदाराचे नाव, वापरकर्तानाव, संकेतशब्द, पुष्टीकरण संकेतशब्द, ईमेल आयडीसाठी ओटीपी आणि मोबाइल नंबरसाठी ओटीपी यासारख्या आवश्यक माहिती प्रविष्ट करा.
- ईमेल आयडी आणि मोबाइल नंबरच्या बाबतीत, ईमेल पत्त्यावर आणि मोबाइल क्रमांकावर एक सत्यापन ओटीपी पाठविला जाईल
- ओटीपी क्रमांक प्रविष्ट करा
- ‘नोंदणी’ वर क्लिक करा
- आपला आधार क्रमांक प्रविष्ट करा
- पुढील चरणात प्रमाणीकरण समाविष्ट आहे. आपण बायोमेट्रिक प्रमाणीकरण किंवा ओटीपी (वन टाइम संकेतशब्द) प्रमाणीकरण दरम्यान निवडू शकता
- ओटीपी पर्याय निवडल्यास, आपल्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर एक ओटीपी नंबर पाठविला जाईल. सत्यापनानंतर, आपली सर्व नोंदणीकृत माहिती प्रदर्शित केली जाईल.
- लॉगिन हेतूसाठी आता एक वापरकर्तानाव आणि संकेतशब्द तयार करा
-
सूचना
शिष्यवृत्ती/ सरकारी अनुदान बँकेच्या खात्यात जमा होण्यासाठी आपल्या खात्याला आधार सीड असणे गरजेचे आहे. तरी काही विद्यार्थ्यांना बँक खात्यात आधार सीड नसल्यामुळे पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती जमा होण्यास व्यत्यय येत आहे. असे विद्यार्थी जवळच्या पोस्ट ऑफिसला भेट देऊन ‘इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेचे’ आधार सीड असलेले खाते उघडण्याचा लाभ घेऊ शकतात. खाते उघडण्यासाठी पुढील बाबींची आवशकता आहे.-
- 1 मोबाईल क्रमांक
- 2 आधार क्रमांक
- 3 पॅनकार्ड (उपलब्ध असेल तर)
- 4 शिष्यवृत्ती अँप्लिकेशन क्रमांक.
‘इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेचे’ खाते साधारण बचत खाते असल्याने ते उघडणायची सुविधा इतर विद्यार्थी तथा नागरिकांना पण उपलबध आहे. हे खाते तात्काळ उघडले जाते आणि त्यासाठी कुठल्याही कागदपत्राची गरज भासत नाही. तरी सर्वानी ह्या संधीचा फायदा घ्यावा.
शिष्यवृत्ती: MahaDBT शिष्यवृत्ती अर्ज प्रक्रिया 2021-22
शिष्यवृत्ती विभाग:
अ. क्र. | शिष्यवृत्ती विभाग |
1 | सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग |
2 | आदिवासी विकास विभाग |
3 | उच्च शिक्षण संचालनालय |
4 | तंत्रशिक्षण संचालनालय |
5 | शालेय शिक्षण व क्रीडा विभाग |
6 | OBC, SEBC, VJNT आणि SBC कल्याण विभाग |
7 | वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय |
8 | अल्पसंख्याक विकास विभाग |
9 | कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभाग |
10 | महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी |
11 | कला संचालनालय |
12 | MAFSU नागपूर |
13 | कृषी विभाग |
14 | अपंगत्व विभाग |