कृषी संशोधन संस्थेत दहावी पास असणाऱ्यांना नोकरीची संधी

51

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. भारतीय कृषी संशोधन संस्थेने(IARI) परिषद आणि त्याच्या विविध प्रादेशिक केंद्रांमध्ये तंत्रज्ञ पदांच्या भरतीसाठी (Technician Posts Recruitment) जाहिरात प्रसिद्ध केली आहे. संस्थेने जाहीर केलेल्या भरती जाहिरातीनुसार (No.1-1/2021Rectt Cell/Technician) तंत्रज्ञांच्या एकूण ६४१ पदांची भरती करण्यात येणार आहे. यासाठी उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत.

पदांचा तपशील
एकूण ६४१ पैकी २८६ पदे ही खुल्या वर्गासाठी आहेत. तर १३३ पदे ओबीसी, ६१ पदे ईडब्ल्यूएस, ९३ पदे एससी आणि एसटीची ६८ पदे प्रवर्गातील उमेदवारांसाठी राखीव आहेत. IARI च्या जाहिरातीनुसार पदांची संख्या वाढविली किंवा कमी केली जाऊ शकते.

पात्रता
ICAR-IARI ने जाहीर केलेल्या तंत्रज्ञ भरतीच्या जाहिरातीनुसार, या पदांसाठी उमेदवारांकडे मान्यताप्राप्त मंडळातून दहावी उत्तीर्ण किंवा इतर कोणतीही समकक्ष पात्रता असणे गरजेचे आहे.

वयोमर्यादा
उमेदवारांचे वय १८ वर्षांपेक्षा कमी आणि ३० वर्षांपेक्षा जास्त नसावे. आरक्षित वर्गातील उमेदवारांसाठी उच्च वयोमर्यादेत शिथिलता देण्यात आली आहे.

अर्ज प्रक्रिया
ICAR मधील तंत्रज्ञ पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार अधिकृत वेबसाइट nbri.res.in वर जाऊन अर्ज करु शतात. यासाठी अर्ज प्रक्रिया १८ डिसेंबरपासून सुरु होणार असून उमेदवार १० जानेवारी २०२२ पर्यंत त्यांचे अर्ज सादर करू शकतील. ऑनलाइन अर्जादरम्यान, उमेदवारांना IARI ने निर्धारित केल्यानुसार १०० रुपये अर्ज शुल्क देखील भरावे लागेल. जे उमेदवार ऑनलाइन माध्यमातून भरू शकतात.

जाहिरात क्र.: 1-1/2021/Rectt. Cell/Technical (CBT) 

Total: 641 जागा

पदाचे नाव: टेक्निशियन (T-1)

UR EWS SC ST OBC Total
286 61 93 68 133 641

शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण.

वयाची अट: 10 जानेवारी 2022 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]  

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC/EWS: ₹1000/-    [SC/ST/ExSM/PWD/महिला: ₹300/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 जानेवारी 2022 (11:55 PM)

परीक्षा (CBT): 25 जानेवारी ते 05 फेब्रुवारी 2022

अधिकृत वेबसाईट: पाहा