सहा ग्रामपंचायतीतील नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा सर्वसाधारण प्रवर्गात रूपांतरित करून 18 जानेवारी रोजी मतदान

61

Ø तर मतमोजणी 19 जानेवारी रोजी होणार

चंद्रपूर दि. 17 डिसेंबर: जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील घडोली, वरोरा तालुक्यातील चिकणी, कोरपना तालुक्यातील विरूर गाडेगाव, सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी, मूल तालुक्यातील गडीसुर्ला, नागभीड तालुक्यातील मेंढा किरमिटी या 6 ग्रामपंचायतीच्या नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा निवडणूक आयोगाच्या 7 डिसेंबर 2021 च्या पत्रान्वये स्थगित करण्यात आल्या होत्या.

            राज्य निवडणूक आयोगाने दि. 17 डिसेंबर 2021 रोजीच्या आदेशान्वये स्थगित करण्यात आलेल्या नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा या सर्वसाधारण प्रवर्गात रूपांतरित करण्यात आल्या असून या जागांच्या निवडणुका दि. 18 जानेवारी 2022 रोजी घेण्यात येणार आहे. तर मतमोजणी 19 जानेवारी 2022 रोजी होणार आहे.

या निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्रे दि. 28 डिसेंबर 2021 ते 3 जानेवारी 2022 या कालावधीत तालुका मुख्यालयी स्वीकारण्यात येणार आहेत. तसेच सुधारित कार्यक्रमानुसार सध्या सुरू असलेल्या आचारसंहितेचा कालावधी हा दि. 19 जानेवारी 2022 पर्यंत राहील, असे राज्य निवडणुक आयोगाचे आदेश असल्याचे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.