राष्ट्रीय लोक अदालतीच यशस्वी आयोजन; 169523रुपयांचा महसूल जमा

60

मुल:- नुकत्याच पार पडलेल्या तालुका विधी सेवा समिती मूल च्या  लोक अदालत मध्ये एकुण 71 प्रकरणे निकाली निघाली.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या सुचनेनुसार मूलदिवाणी व फौजदारी न्यायालय मूल च्या वतीने आयोजित लोकअदालती मध्ये न्यायालयीन प्रकरणे तसेच न्यायालयात दाखल पूर्तिचीप्रकरणे ठेवण्यात आली.आलेल्या प्रकरणापैकी मुल न्यायालयातीलप्रलंबीत 11 प्रकरणे आणि न्यायालयात दाखलपुर्व 71 प्रकरणे निकालीनिघाली. न्यायालयात दाखलपूर्व 56 प्रकरणे ही तालुक्यातील ग्रामपंचायत मधिल थकबाकीदारांची होती यांचे कडून 169523/रूपये(एक लाख एकोणसत्तर हजार रूपये) कर वसुली करण्यात आली.

सदर  लोकअदालत मुल येथिल दिवाणी न्यायालयाचे न्यायधिश मान.अ.वि.ढोरे हे पॅनल प्रमूख म्हणून तर पॅनल सदस्य अॅड.एस.पी.मुदमवार,अशोक एच.येरमे यांचे उपस्थित पार पाडली.लोक अदालतीच्या यशस्वीतेकरीता ग्रामविकास अधिकारी,ग्रामसेवकप्ंाचायत समितीचे कर्मचारी,अधिवक्ता तसेच न्यायालयीन कर्मचारीयांनी सहकार्य केले.