कोविडमुळे मृत पावलेल्या व्यक्तीच्या निकट नातेवाईकानी सानुग्रह सहाय्यासाठी ऑनलाईन अर्ज करावेत- तहसिलदार डाॅ.रविंन्द्र होळी

27

मुल येथे तहसिल कार्यालयात मदत केंद्रांची स्‍थापना

Ø  अर्ज भरतांना समस्या असल्यास  07172-274161 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन

कोविड-19 या आजाराने मृत पावलेल्या व्यक्तींच्या निकटच्या नातेवाईकांना 50 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. त्यासाठी  शासनाने विकसित केलेल्या पोर्टलवर ‘कोविड19’ मुळे मृत पावलेल्या व्यक्तींचे नातेवाईक, वारसांनी  तातडीने ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन तालुका आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे  तथा तहसिलदार डाॅ.रविंन्द्र होळी यांनी  केले आहे.

ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धती

कोविड-19मुळे मृत व्यक्तीचे निकटचे नातेवाईक, अर्जदारांनी  mahacovid19relief.in या संकेतस्थळावर लॉगिन करणे आवश्यक आहे.  मृत व्यक्तीचे निकटचे नातेवाईक, अर्जदारास त्याचा आधार क्रमांक, मृत व्यक्तीचे आधार कार्ड,(पीडीएफ, जेपीजी स्वरूपात),मृत्यू प्रमाणपत्र (पीडीएफ, जेपीजी स्वरूपात) मृत व्यक्तीचे निकटचे नातेवाईक, अर्जदाराचा आधार संलग्न बँक खाते क्रमांक, अर्जदाराने खाते क्रमांक दिलेल्या बँक खात्याचा रद्द केलेला धनादेश (पीडीएफ, जेपीजी स्वरूपात) आणि रुग्णालयाचा तपशील, आरटीपीसीआर रिपोर्ट, सीटी स्कॅन रिपोर्ट किंवा ज्यावरुन त्या व्यक्तीस ‘कोविड19’ चे निदान झाले, अशी कागदपत्रे (पीडीएफ, जेपीजी स्वरूपात) अपलोड करावे. या कागदपत्राच्या आधारे अर्जदाराला स्वतःचा मोबाईल क्रमांक वापरून साहाय्य मिळविण्यासाठी  लॉगिन करता येईल.

अर्ज सादर करण्याबाबत व आवश्यक कागदपत्रांबाबत माहिती mahacovid19relief.in या पोर्टलवर डॉक्युमेंट रिक्वायर्ड या टॅबवर उपलब्ध आहे.  अर्ज भरण्‍याकरीता  मुल येथे तहसिल कार्यालयात मदत केंद्रांची स्‍थापना करण्‍यात आली आहे. सदर मदत केंद्रावर विनाशुल्‍क ऑनलाईन अर्ज भरण्‍यात येतील. नागरिकांनी अर्ज करतेवेळी संबंधित कागदपत्रे व मोबाईल सोबत ठेवणे आवश्‍यक आहे. सदर मदत केंद्राचे कामकाज कार्यालयीन वेळेत सुरू राहील. अर्ज भरण्‍याबाबत काही समस्‍या असल्‍यास 07172-274161 या क्रमांकावर संपर्क करावा.

अर्जदाराने चुकीची माहिती देऊन अनुदान घेतल्यास अर्जदार फौजदारी कार्यवाहीसाठी पात्र असेल. एका मृत व्यक्तीसाठी एकाच जवळच्या नातेवाईकांना अर्ज करता येईल. अनेक नातेवाईकांनी केलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून शासन निर्णयानुसार अंतिमतः मंजूर करण्यात आलेल्या अर्जानुसार, अर्जदाराच्या आधार संलग्नित बॅंक खात्यात सानुग्रह साहाय्य निधी जमा करण्याची कार्यवाही करण्यात येईल. असे तालुकाआपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा तहसिलदार डाॅ.रविंन्द्र होळी यांनी कळविले आहे.