पंतप्रधान ठिबक सिंचन योजनेत नवी घोषणा

44

पंतप्रधान ठिबक सिंचन योजना ही सन 2015 मध्येच सुरु करण्यात आली आहे. मात्र, यामध्ये महत्वाचे बदल करण्यात आले असून म्हणजेच यामध्ये 2 वर्षांची वाढ करण्यात आली आहे.पाण्याचा अपव्यय टाळता यावा व योग्य वापर करुन शेतकऱ्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये म्हणून ही योजना सुरु करण्यात आली होती. शिवाय केंद्र सरकारने या योजनेकरिता 50 हजार कोटींची तरतूदही केली आहे. सिंचनासाठी जर स्प्रिंकलरचा वापर केला तर 80 ते 90 टक्के अनुदान सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळणार आहे. शिवाय स्प्रिंकलरमुळे शेतजमिनीचे नुकसान तर होणार नाहीच शिवाय कमी उंचीच्या पिकांसाठी हे प्रभावी आहे.

आता सरकारने काय निर्णय घेतला आहेपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधान कृषी सिंचन योजने वाढीव मुदत देण्यात आली आहे. आता ही योजना 2025-26 पर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे अधिक शेतकऱ्यांना याचा लाभ घेता येणार आहे.योजनेचा कोण लाभ घेऊ शकते

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे शेतजमिन असणे आवश्यक आहे. शेतकरी वैयक्तिक तर लाभ घेऊ शकतोच शिवाय शेती गट, संस्था, सहकारी संस्था, कॉर्पोरेट कंपन्या, शेती उत्पादक कंपन्यांच्या गटांचे सदस्य आणि इतर पात्र संस्थांचे सदस्य यांनाही लाभ घेता येणार आहे. पंतप्रधान ठिबक सिंचन योजना 2021 चा हा अशा शेतकऱ्यांनाही होणार आहे जे गेल्या सात वर्षांपासून भाडेपट्टी करारांतर्गत शेतजमिन करीत आहेत. कंत्राटी पध्दतीने शेती करणाऱ्यांनाही याचा लाभ मिळणार आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी असा करा अर्ज

सर्वप्रथम इच्छूकाला महाडीबीटी ऑनलाइन पोर्टल ओपन करायचे आहे. यामध्ये मुखपृष्ठावर अर्ज करा असा टॅग दिसेल त्याला क्लिक करायचे आहे. त्यानंतर सिंचन साधने सुविधा यावर क्लिक करुन समोरील बाबी निवडा हा पर्याय ओपन करायचा आहे. यामध्ये जिल्हा तालुका गाव आणि वैयक्तिक माहिती भरायची आहे. ही माहिती भरून झाल्यानंतर मुख्य घटक मध्ये सिंचन साधने आणि सुविधा हा घटक निवडायचा आहे.

*यानंतर दिलेली माहिती पूर्ण भरायचे आहे. ज्या पिकासाठी आपल्याला ठिबक सिंचन पाहिजे आहे त्याची माहिती देते भरावी लागणार आहे. यानंतर पूर्वसंमती शिवाय मी योजनेचा लाभ घेणार नाही अशी नोंद करावी लागणार आहे. यानंतर भरलेली माहिती सेव्ह करायचे आहे. यानंतर मुख्य मेनू वर जाऊन ऑप्शन वर क्लिक करायचे आहे. मेनू वर आल्यानंतर सर्वात प्रथम ‘अर्ज सादर करा’ यावर क्लिक करायचे आहे. यानंतर तुम्हाला तालुका हे ऑप्शन दिसेल शिवाय तुम्ही ज्यासाठी अर्ज केला आहे त्या योजनेचे नाव देखील येते समोर येईल.

यानंतर प्राथमिक प्रधान्य क्रमांक देऊन अटी-शर्ती त्या मान्य असल्याचे नमूद करावे लागणार आहे. यानंतर आपल्याला अर्ज सादर करावा लागणार आहे.