सामाजिक सुरक्षा योजना कार्यान्वित. असंघटित कामगारांसाठी योजना: नोंदणी करण्याचे आवाहन

38

ई-श्रम पोर्टलच्या माध्यमातून सामाजिक सुरक्षा योजना कार्यान्वित असंघटित कामगारांसाठी योजना: नोंदणी करण्याचे आवाहन

मुल:- असंघटित कामगारांसाठी ई-श्रम पोर्टलच्या माध्यमातूनसामाजिक सुरक्षा योजना कार्यान्वित करण्यात आली असून प्रथमअसंघटित कामगारांचा डाटा तयार करण्यात येत आहे.त्यासाठीअसंघटित कामगारंानी ई-श्रम पोर्टलवर आपली नावे नोंदवावीत,असे आवाहन प्रमोद मशाखेत्री यांनी केले आहे.

          शासनाने असंघटित कामगारंाना सामाजिक सुरक्षा प्रदानकरण्यासाठी अधिनियम तयार करून अमलात आणण्याच्या दुष्टीने ई-श्रमपोर्टलच्या माध्यमातून नोदंणी करण्याचे कार्य युध्दपातळीवर सुरू झाले आहे.बिडी कामगार,मासेमार,सुतार कामगार,भाजी आणि फळ विक्रेते,वृत्तपत्र विक्रेते,वीटभटी कामगार यासारख्या विविध व्यवसाय गटांतील असंघटित क्षेत्रात
काम करणा-या कामगारांना सामाजिक सुरक्षा पुरविण्यात येणार आहे.त्याकरिता असंघटित कामगारांसाठी डाटा ई-श्रम पोर्टलच्या माध्यमातूनएकत्रित केला जात आहे.

        या परिसरातील कोणताही असंघटित कामगार नोंदणीपासून वंचित राहू नये म्हणून ई-श्रम कार्ड नोंदणी करून दिली जात आहे.असंघटित कामगारांनीई-श्रम पोर्टलवर आली नावे नोंदवावीत,असे आवाहन मशाखेत्री यांनी केले आहे.