पीएम किसान योजनेचे नियम बदलले; ही गोष्ट तातडीने करा नाहीतर लाभापासून राहाल वंचित

38

पीएम किसान योजनेच्या नियमांमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांसाठी ई-केवायसी (eKYC) करणे बंधनकारक करण्यात आले आहे. पोर्टलवर दिलेल्या माहितीनुसार, तुम्ही आधीच्या कॉर्नर पर्यायाला भेट देऊन किंवा जवळच्या सीएससी (CSC) केंद्राला भेट देऊन आधार आधारित ओटीपी (OTP) प्रमाणीकरण थेट करू शकता. तुम्ही घरबसल्या मोबाईल, लॅपटॉप आणि कॉम्प्युटरद्वारे ई-केवायसी (eKYC) प्रक्रिया ऑनलाइन करू शकता.

पीएम किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात १० वा हप्ता जमा होणार आहे. कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर केंद्र सरकारकडून यादीही जाहीर करण्यात आली. याअंतर्गत १५ डिसेंबरपर्यंत १० व्या हप्त्याचे २००० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात येतील. दुसरीकडे, जर तुम्ही पीएम किसान योजनेअंतर्गत नोंदणी दरम्यान ई-केवायसी (eKYC) केले नसेल किंवा ई-केवायई (eKYE) केले नसेल, तर तुमचे हप्त्याचे पैसे थांबू शकतात. ईकेवायसी करण्यासाठी तुम्हाला पीएम किसान योजनेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.

अशा प्रकारे ऑनलाइन करा ईकेवायसी –
– सर्वप्रथम तुम्ही https://pmkisan.gov.in/ पोर्टलवर जा.
– त्यानंतर तुम्ही फार्मर कॉर्नरवर जा.
– येथे तुम्हाला ई-केवायसी (eKYC) च्या नवीन पर्यायावर क्लिक करावे लागेल.
– तुमच्या समोर एक नवीन पान उघडेल.
– त्यानंतर आधारशी लिंक केलेला मोबाईल नंबर टाका आणि नंतर ओटोपी (OTP) टाका.
– जर सर्व प्रक्रिया पूर्ण झाली, तर ई-केवायसी (eKYC) पूर्ण होईल. प्रक्रिया पूर्ण झाली नाही, तर स्क्रीनवर इनव्हॅलिड (Invalid) लिहलेले दिसेल.

पीएम किसान योजनेचा हप्ता अडकू शकतो
ई-केवायसी (eKYC) प्रक्रिया अवैध झाल्यास तुमचे पैसे अडकून पडू शकतात. जे तुम्ही जवळच्या आधार सेवा केंद्राला भेट देऊन दुरुस्त करू शकता. केंद्र सरकार यावर्षीचा पीएम किसानचा शेवटचा हप्ता देणार आहे. या योजनेत शेतकऱ्यांना दरवर्षी ६००० रुपये मदत दिली जाते.