पंतप्रधान आवास योजनेच्या हप्तयाअभावी घरे अर्धवट मूल न.प.

43

घराच्या पायाचे बांधकाम पूर्ण; योजना पूर्ण होण्याबाबत साशंकता

मुल नगरपरीषद अंतर्गत  घरकुल लाभार्थी अडचणीत

मुल :- सर्वांसाठी घरे,या संकल्पनेतून पंतप्रधान आवास योजना राबविण्यात आली.मात्र,18 महिन्यांचा कालावधी लोटूनही लाभाथ्र्यांना अद्याप अर्धे हप्ते न मिळाल्याने त्यांची घरे अर्धवट राहिली असून  ‘इकडे आड,तिकडे विहीर‘ अशीच अवस्था झाल्याने रोश व्यक्त होत आहे.केरोना संकटाने आर्थिक संकट ओढवले.हाताची कामे गेल्याने बेरोजगारी कु-हाड कोसळली. अषाही परिस्थितीषी गाठीषी असलेला पैसा खर्च करून घराची कामे पूर्ण केली.

        काहींची कामे अर्धवट राहिली असून आज ना उद्या घरकुलाचे हप्ते मिळेल,अषी लाभाथ्र्याना अपेक्षी होती,2 वर्श निघून गेले पण हप्ता मिळाला नाही.शासनाकडून घरकुल मंजूर झाल्याने आपली जीर्ण झालेली घरे पाडूनआवास योजनेसाठी नवीन घरे बांधायला सुरूवात केली.अनेकानी किरायाच्या घरी राहून घरकुलाच्या कामाला सुरूवात केली.

उसनवारी ने पैसे घेऊन अनेकांनी घराचे बांधकाम पूर्णत्वास नेले.पण,आता तिसरा,चैथा हप्ता मिळाला नसल्याने घरकुलाचे बांधकाम थांबले आहे.एकीकडे घरे बांधकामाची चिंता आणि दुसरीकडे घरभाडयाचा भर यामुळेलाभार्थी आता आर्थिक विवंचनेत सापडले आहेत.

अनेकदा मुल नगरपरिशदेत विचारणा केल्यावरही समाधानकारक उत्तर  मिळत नसल्याने तीव्र रोश व्यक्त होत आहे.