तुम्हाला ५० हजारापर्यंत कर्ज हवंय? १५ डिसेंबरपर्यंत ही आहे ऑफर

42

अनेक जण व्यवसाय  किंवा उद्योगासाठी कर्ज घेऊ इच्छितात. सरकारी योजना असतात पण त्याची माहिती त्यांना नसते. पंतप्रधान मुद्रा योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाचे वृत्त आहे.

कारण, या योजनेअंतर्गत तुम्हाला ५० हजार रुपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकते. त्यासाठी येत्या १५ डिसेंबरपर्यंत विशेष सवलत आहे.

पीएम मुद्रा योजनेअंतर्गत कर्जावर 2 टक्के व्याज सवलत दिली जाते. त्याची अंतिम मुदत 15 डिसेंबर आहे. 31 डिसेंबर 2021 पासून PMMY पोर्टल व्याज सबव्हेंशन स्कीम (ISS) बंद केले जाईल. 15 डिसेंबरनंतर कर्ज घेणाऱ्यांना 2 टक्के व्याज सवलत योजनेचा लाभ घेता येणार नाही.

प्रधानमंत्री मुद्रा योजना (PMMY) 8 एप्रिल 2015 रोजी पंतप्रधान मोदींनी सुरू केली होती. ही योजना नॉन-कॉर्पोरेट, नॉन-फॉर्म लघु आणि सूक्ष्म उद्योगांसाठी 10 लाखांपर्यंत कर्ज देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत कर्जाचे अनेक प्रकारांमध्ये वर्गीकरण केले जाते. पीएमएमवाय हे एक राष्ट्रीय मिशन आहे. ज्याचे उद्दिष्ट स्वयंरोजगार निर्माण करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देणे आणि लहान उद्योजकांना रोजगार निर्मितीसाठी प्रोत्साहित करणे आहे. या अंतर्गत शिशु, किशोर आणि तरुण अशा तीन योजना आहेत.

या तीन योजनांतर्गत कर्ज घेता येते
= शिशू कर्ज- या अंतर्गत 50 हजार रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते.
= किशोर कर्ज- किशोर कर्जाअंतर्गत 50 हजार ते 5 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते.
= तरुण कर्ज- 5 लाख ते 10 लाख रुपयांपर्यंतची कर्जे तरुण अंतर्गत येतात.
मुद्रा योजना (PMMY) अंतर्गत कर्जासाठी, तुम्हाला सरकारी किंवा बँकेच्या शाखेत अर्ज करावा लागेल. तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल, तर तुम्हाला घराच्या मालकीचे कागदपत्र किंवा भाड्याची कागदपत्रे, कामाशी संबंधित माहिती, आधार, पॅन क्रमांक यासह इतर अनेक महत्त्वाची कागदपत्रे द्यावी लागतील.
यानंतर बँकेचे शाखा व्यवस्थापक तुमच्याकडून कामाची माहिती घेतील आणि त्या आधारावर तुम्हाला पीएमएमवाय कर्ज दिले जाईल. यासाठी तुम्ही पोर्टलवर ऑनलाइन अर्जही करू शकता. इच्छुक व्यक्ती PMMY बद्दल अधिक माहिती (https://www.mudra.org.in/) या वेबसाइटला भेट देऊन मिळवू शकतात.