शासकीय वसतिगृहात आॅफलाईन पध्दतीने अर्ज

39

च्ंाद्रपूर:-सन 2021-22 या शैक्षणिक वर्षाकरीता सहायकआयुक्त,समाज कल्याण,चंद्रपूर कार्यालयांतर्गत शासकीय वसतिगृहातीलविद्याथ्र्यांची प्रवेश प्रक्रिया आॅफलाईन पध्दतीने करण्यात येणार आहे.जिल्हयातील वरोरा,चंद्रपूर,सिंदेवाही,राजूरा,ब्रम्हपूरी येथील मुलांचे वसतिगृहतर चंद्रपूर ,मूल,बल्लारपूर,चिमूर,ब्रम्हपूरी,येथील मुलींच्या वसतिगृह अशा एकूण 771 रिक्त जागेवरील प्रवेशासाठी विद्यार्थी व पालक यांनी संबंधीत वसतिगृहाचे
गृहपालांकडे अर्ज सादर करावा,असे आवाहन करण्यात आले आहे.पहिल्या व दुस-या निवड यादीमध्ये वसतिगृहातील प्रवेशाच्या जागा रिक्तराहिल्यास स्पॅाट अॅडमिशन करिता प्रथम येणा-या विद्याथ्र्यास प्राधान्यदेण्यात येणार आहे.असे असे समाजकल्याण विभाागाचे सहायक आयुक्तअमोल यावलीकर यांनी कळविले आहे.

विशेष म्हणजे,कोरोना संकटानंतर मागील वर्षी वसतीगृह बंद होते.आता शाळा सुरू झाल्या असून वसतीगृह सुरू करण्याची प्रक्रीया सुरू करण्यात आली आहे.प्रवेश पात्रता:- शालेय विद्यार्थी,दहावी व 11 वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्येप्रवेश घेतलेल्या विद्याथ्र्यासाठी (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) तसेचबी.ए.बी.काॅम व बी.एस.सी अशा 12 वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्यापदविका,पदवी आणि एम.ए.काॅम. आणि एम.एस.सी.असे पदवीनंतरचे पदव्युत्तरपदवी,पदविका आदी अभ्यासक्रम (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून ) 20डिसेंबर पर्यंत अर्ज करता येणार आहे,तर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठीप्रवेश घेतलेले विद्यार्थी 31 डिसेंबर पर्यंत अर्ज करू शकणार आहे.