मूल (सोमनाथ) कृषी महाविद्यालयात कृषी शिक्षणदिन उत्साहात

36

मूल : देशातील ५५ टक्के पेक्षा जास्त जनता कृषी व्यवसायावर अवलंबून आहे. दोन वर्षाच्या कोरोना काळात कृषी क्षेत्राने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्यामुळे कृषी विषय व त्यांचे शिक्षण पुढच्या पिढीला महत्त्वाचे आहे, असे मत महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विष्णुकांत टेकाळे यांनी व्यक्त केले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत सुरू असलेल्या कृषी महाविद्यालय, मूल (सोमनाथ) येथे आयोजित कृषीदिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. देशाचे पहिले राष्ट्रपती भारतरत्न डॉ. राजेद्र प्रसाद यांची जयंती राष्ट्रीय कृषीदिन म्हणून साजरी करण्यात आली.

महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विष्णुकांत टेकाळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कार्यक्रमात प्रा. डॉ. सुमेध काशीवार, डॉ. राहुल चहांदे, डॉ. नंदेश्वर आदी उपस्थित होते. डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या प्रतिमेला अभिवादन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी प्रा. डॉ. सुमेश काशीवार आणि डॉ. राहुल चहांदे यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन डॉ. व्ही. एन. नंदेश्वर यांनी केले. दिप्ती आगरकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाला विद्यार्थी, कर्मचारी आणि निमंत्रित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.