महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत मूल येथे आज कार्यशाळेचे आयोजन

45

तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष मूल येथे आज दिनांक 06.12.2021 रोजी पंचायत समिती सभागृहात स्वयं सहायता समूहांना शाश्वत उपजीविका निर्माण होण्याच्या दृष्टीने सिटी ग्रुप यांच्या सौजन्याने शेतीसाठी जोडधंदा या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले सदर कार्यशाळेला मार्गदर्शक म्हणून लाभलेले सिटी ग्रुप चे झोनल मॅनेजर डॉ. दिनेश वाळके सर यांनी फिश फार्मिंग आणि मोती फार्मिंग या दोन प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली. ज्यामध्ये सिटी ग्रुप कडून संपूर्ण प्रोजेक्ट इंस्टॉल करून दिल्या जाईल आणि त्यामधून उत्पादित होणारा माल कंपनी स्वतः विकून देण्याची जबाबदारी घेईल. यामुळे स्वयं सहाय्यता समूह याना मोठ्या प्रमाणात नफा मिळवून देण्याचा व महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले. सदर कार्यक्रम करीता प्रकाश तुरानकर तालुका अभियान व्यवस्थापक, निलेश जीवनकर तालुका व्यवस्थापक, जयश्री कामडी तालुका समन्वयक, स्नेहल मडावी तालुका समन्वयक, वसीम काझी प्रशासन व लेखा सहाय्यक, अमर रंगारी प्रभाग समन्वयक,कु. शिंदे, प्रभाग समन्वयक रुपेश आदे प्रभाग समन्वयक, मयूर गड्डमवार CAM उपस्थित होते.कार्यक्रमच्या यशस्वीतेसाठी समूह संसाधन व्यक्ती यांनी अथक परिश्रम घेतले.