संजय मारकवार यांच्या स्मृतीदिन विविध उपक्रमाने साजरा

36

पंचायत समिती आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा कॉंग्रेसचे तालुक्यातील दिवंगत नेते संजय मारकवार यांचा प्रथम स्मृतीदिन वृक्षारोपण आणि ब्लॅकेट व फळ वाटप करून साजरा करण्यांत आला. सकाळी 8 वाजता राजगड येथील स्मशानभूमीत वृक्षारोपण करण्यांत आले. यावेळी त्यांचे बंधु चंदुपाटील मारकवार आणि स्व. संजय मारकवार यांच्या स्नेहीजणांनी विविध वृक्षाचे रोपण केले. त्यांचे ज्येष्ठ बंधु राजु मारकवार यांचे वतीने कॉंग्रेसचे स्थानिक नेते तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत आणि प्रभारी वैद्यकिय अधिक्षक डॉ. उज्वल इंदोरकर यांचे हस्ते स्थानिक उपजिल्हा रूग्णालय मूल येथे रूग्ण आणि गरजुंना ब्लॅकेंट आणि फळ वाटप करण्यांत आले. यावेळी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा बाजार समिती सभापती घनश्याम येनुरकर, उपसभापती संदिप कारमवार, संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे अध्यक्ष राकेश रत्नावार, सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष तथा बाजार समिती संचालक अखील गांगरेड्डीवार, राजेंद्र कन्नमवार, महिला कॉंग्रेसच्या तालुकाध्यक्षा रूपाली संतोषवार, नगरसेवक लिना फुलझेले, कॉंग्रेसचे शहरअध्यक्ष सुनिल शेरकी, युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष पवन निलमवार, क्रांतीज्योती नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष गुरुदास गुरनुले, सुमीत आरेकर, प्रदीप कामडे, गणेश खोब्रागडे, कैलास चलाख, अनिल निकेसर, सुरेश फुलझेले, गुरूदास चौधरी, हसन वाढई, विवेक मुत्यलवार, जगदीश कडस्कर यांचेसह कॉंग्रेसचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचा समारोप रूग्णालय परिसरात सामुहिक श्रध्दांजलीने करण्यांत आला.  यावेळी संतोषसिंह रावत यांनी स्व. संजय मारकवार हे तालुक्यात कॉंग्रेसचे कर्तृत्ववान, धडाडीचे नेते आणि कॉंग्रेसची मोठी शक्ती होती, परंतू त्यांच्या अकाली निधनाने तालुक्यात कॉंग्रेसची मोठी हानी झाली असून ही हानी कधीही भरून न निघणारी आहे. त्यामूळे त्यांची आठवण सदोदीत येत असते. अश्या भावना व्यक्त करून श्रध्दांजली अर्पण केली.