BSF मध्ये नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि वयोमर्यादासह

74

तुम्हाला डायरेक्टोरेट जनरल बॉर्डर सिक्युरिटी फोर्स म्हणजेच BSF मध्ये नोकरी करायची असेल, तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. BSF ने विविध पदे भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत.

या रिक्त जागा गट ‘सी’ लढाऊ (Non Gazetted-Non Ministerial) पदांसाठी आहेत. अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी पात्रता, वयोमर्यादा आणि इतर तपशील जाणून घेणे महत्वाचे आहे. अधिसूचनेत असे म्हटले आहे की, सीमा सुरक्षा दलातील अभियांत्रिकी पदांच्या भरतीसाठी ही भरती मोहीम राबविण्यात येत आहे.

इच्छुक आणि पात्र उमेदवार BSF च्या अधिकृत वेबसाइट rectt.bsf.gov.in वर जाऊन या पदांसाठी अर्ज करू शकतात. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 डिसेंबर 2021 रात्री 11:59 पर्यंत आहे. त्यामुळे हे लक्षात घ्या की, तुमच्याकडे फार कमी दिवस शिल्लक आहे, ज्यात तुम्ही संपूर्ण माहिती घेऊन अर्ज करु शकता.

BSF भरती 2021 रिक्त जागा तपशील

ASI – 1 पद
HC (कारपेंटर, सीवरमॅन) – 6 पदे
कॉन्स्टेबल (जनरेटर ऑपरेटर, जनरेटर मेकॅनिक, लाइनमॅन) – ६५ पदे

BSF भरती 2021 साठी वयोमर्यादा

अधिकृत अधिसूचनेनुसार, 29 डिसेंबर 2021 रोजी उमेदवारांचे वय 18 ते 25 वर्षांच्या दरम्यान असावे.

BSF भरती 2021 साठी अर्ज करण्याच्या स्टेप्स जाणून घ्या.

उमेदवार त्यांचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने सबमिट करू शकतात.

अर्ज करण्याची दुसरी पद्धत नाही. तुम्ही BSF वेबसाइट – https://rectt.bsf.gov.in द्वारे अर्ज करू शकता.

BSF भरती 2021 साठी महत्वाची तारीख

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख – 15 नोव्हेंबर 2021
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 डिसेंबर 2021

BSF भरती 2021 साठी अर्ज फी

उमेदवारांना अर्ज फी म्हणून 100 रुपये भरावे लागतील.

BSF भरती 2021 साठी ग्रेड पे

ASI – पे मॅट्रिक्स लेव्हल-5 (29 हजार 200 रुपये – 92 हजार 300 रुपये) 7 व्या CPC नुसार
SC – पे मॅट्रिक्स लेव्हल-4 (29 हजार 500 रुपये – 81 हजार100 रुपये) 7 व्या CPC नुसार
कॉन्स्टेबल स्तर – 2 हजार 700रुपये ते 69 हजार 100 रुपये.

बीएसएफ भरती 2021 अधिसूचनेची थेट लिंक- https://rectt.bsf.gov.in/static/bsf/pdf/BSF%20Group-C%20Engineers%20Recruitment.pdf