महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानअंतर्गत बोरचांदली शाळेमध्ये आदर्श शाळा करण्यासंबंधी चर्चेचे प्रयोजन

33

महाराष्ट्रातील 100 जि.प.उच्च प्राथ. शाळा ह्यांची निवड करून ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले गुणवत्तापूर्ण शिक्षण अभियान अंतर्गत प्रत्येकी तीन लाख रोख रक्कम दिली जात असून त्या निधीतून गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार शिक्षण विद्यार्थ्यांना दिले जावे यासाठी दिनांक 31 डिसेंबर 2021 पर्यंत नियोजन केले जात आहे. दिनांक ०४-१२-२०२१ जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा बोरचांदली येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले गुणवत्तापूर्ण शिक्षण अभियान अंतर्गत प्राप्त निधीचा खर्च व शासकिय योजना, लोकसहभाग यातून आराखड्यात समाविष्ट असलेल्या कामांवर चर्चा करण्यासाठी बैठक घेण्यात आली. सदरील बैठकीमध्ये तालुका समन्वयक दिक्षा वनकर यांनी उपस्थितांना आराखडा वाचून दाखविण्यात आला आणि ग्रामपंचायत निधीतून कोणती कामे घेतली जाणार, लोकसहभागातून शाळेतील परिसर आणि इतर गोष्टी पूर्ण करण्यासाठी चर्चा करण्यात आली. उपस्थितीतांना सदरील नियोजन आणि कामे पूर्ण करण्यासंदर्भात vstf कार्यालयातून दिलेल्या सूचनेनुसार ३१ डिसेंबर २०२१ अखेरीस करण्यास सांगण्यात आले. सर्व कामे पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून तालुका समनव्यक यांनी मार्गदर्शन केले. चर्चेदरम्यान लोकसहभागातून श्रमदान, शाळेत विद्यार्थ्यांसाठी पोषक परसबाग तयार करणे, शाळेतील परिसर स्वच्छता, भौतिक सुविधांची पूर्तता, स्वच्छता गृहलगत रॅम्प करणे, शाळा रंगरंगोटी व बोलक्या भिंती बाला पेंटिंग, मुलांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धा आयोजित करणे ई. वर भर देण्यात येणार असल्याचे सांगितले. चर्चा झाल्यानंतर एकंदरीत सम्पूर्ण शाळेची पाहणी करण्यात आली. या बैठकीला शाळेतील मुख्याध्यापक जोगी मॅडम, सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक मस्कावार मॅडम, ज्येष्ठ शिक्षक जिल्लेवार सर, इतर विषय शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.