विद्यार्थ्यांनी भरावा यूजीसी शिष्यवृत्ती योजनेचा अर्ज, मिळतील 7,800 Rs प्रति महिना

37

यूनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनने PG कोर्स करणार्‍या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजनेचे अर्ज सुरू करण्याची घोषणा केली आहे. या अंतर्गत प्रोफेशनल पीजी कोर्स करणार्‍या विद्यार्थ्यांना दरमहिना 4500 रुपये आणि 7,800 रुपये मिळतील.

शिष्यवृत्ती योजनेसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार तारखेपूर्वी अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. (UGC Scholarship 2021)

* कुणाला मिळेल शिष्यवृत्ती

टेक्निकल, इंजिनियरिंग, व्यवस्थापन, फार्मसी आणि इतर बिझनेस एज्युकेशनचे कोर्स करणार्‍या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळेल. ME आणि M Tech विद्यार्थ्यांना दरमहिना 7,800 रुपये दिले जातील. तर इतर पीजी कोर्सेसच्या विद्यार्थ्यांना दरमहिना 4,500 रुपयांची शिष्यवृत्ती मिळेल. SC, ST वर्गाच्या विद्यार्थ्यांना या योजनेंतर्गत लाभ मिळेल. (UGC Scholarship 2021)

* यांना मिळणार नाही शिष्यवृत्ती!

नॉन-प्रोफेशनल कोर्समध्ये सहभागी होणार्‍या विद्यार्थ्यांना या योजनेंतर्गत लाभ मिळणार नाही. मास कम्यूनिकेशन अँड जर्नालिजममध्ये MA, MSc, MCom, MSW सारखे यूजीसी गाईडलाईन्सनुसार नॉन-प्रोफेशनल कोर्सचा भाग आहेत.

हे कोर्स करणार्‍या विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही. डिस्टन्स एज्युकेशन घेणारे विद्यार्थी सुद्धा यासाठी पात्र नाहीत. दोन किंवा तीन वर्षाचा पीजी कोर्स करणार्‍या विद्यार्थ्यांनाच या योजनेचा लाभ मिळेल.

* केव्हा मिळेल शिष्यवृत्ती

UGC द्वारे शिष्यवृत्तीची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात टाकली जाईल. मात्र, पुढील वर्गात अ‍ॅडमिशन न झाल्यास विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रोखली जाईल. (UGC Scholarship 2021)

* येथे करा अर्ज (UGC Scholarship 2021 How To Apply)

1 : शिष्यवृत्तीची अधिकृत वेबसाइट scholarship.gov.in वर जा.

2 : होमपेजवर ‘UGC/AICTE’ योजनेवर क्लिक करा.

3 : प्रोफेशनल कोर्स करणार्‍या SC/ST विद्यार्थ्यांसाठी PG स्कॉलरशिपसाठी लिंकवर क्लिक करा.

4 : माहिती वाचून न्यू रजिस्ट्रेशन वर क्लिक करा. पूर्ण माहिती भरा.

5 : शिष्यवृत्ती निवडून ऑनलाइन अर्ज करा.

* आवश्यक कागदपत्र

– बँक पासबुक

– आधार कार्ड नंबर

– सरकारी आयडी कार्ड

– मुळ रहिवाशी दाखला

* अंतिम तारखेपूर्वी भरा अर्ज

शिष्यवृत्ती योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना 15 डिसेंबर 2021 पूर्वी ऑफिशियल वेबसाइटच्या माध्यमातून अप्लाय करा. अर्ज प्रक्रिया 30 नोव्हेंबर 2021 पासून सुरू करण्यात आली आहे. अर्ज भरल्यानंतर विद्यार्थ्यांना तो आपली युनिव्हर्सिटी किंवा कॉलेजमधून व्हेरिफाय करावा लागेल. योजनेंतर्गत 1000 विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ मिळेल.