PM Kisan योजनेसह ‘या’ 4 योजनासुद्धा खुपच कामाच्या, सबसिडीवर खरेदी करू शकता खत, बियाणे आणि ट्रॅक्टर; जाणून घ्या

115

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – PM Kisan | शेतकर्‍यांसाठी सरकार अनेक योजना चालवत आहे, ज्यांचा थेट लाभ शेतकर्‍यांपर्यंत पोहचवला जात आहे. पीएम किसान सम्मान निधी (PM Kisan Samman Nidhi) योजनेंतर्गत शेतकर्‍यांच्या खात्यात 2000 रुपये दर चार महिनयांनी म्हणजे वार्षिक 6000 रुपये पाठवले जातात.

(PM Kisan)

तर काही इतर योजनांमध्ये शेतकर्‍यांना सबसिडीवर खत, बियाणे आणि इतर कृषी उपकरणे उपलब्ध करून दिली जातात. येथे काही अशाच योजनांबाबत जाणून घेणार आहोत, ज्यामध्ये किसान योजनेचा (PM Kisan) लाभ घेऊ शकता. या योजनांबाबत सविस्तर जाणून घेवूयात…

पीएम किसान सम्मान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi Yojana)
शेतकर्‍यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. ज्या अंतर्गत शेतकर्‍यांना तीन हप्त्यात वार्षिक 6,000 रुपये दिले जातात. या योजनेचा लाभ अशा शेतकर्‍यांना दिला जातो, ज्यांच्याकडे दोन हेक्टर जमीन आहे किंवा ते लहान शेतकरी आहेत.

या योजनेत नोंदणी करण्यासाठी, तुम्ही जवळच्या CSC केंद्राशी किंवा गाव प्रमुखाशी संपर्क साधू शकता. याशिवाय, तुम्ही किसान सन्मान निधीच्या अधिकृत वेबसाइटवर किंवा पीएम किसान GOI मोबाइल अ‍ॅपद्वारे देखील नोंदणी करू शकता.

किसान क्रेडिट योजना (Kisan Credit Scheme)
या योजनेंतर्गत गरज असेल तेव्हा शेतकरी कर्ज दिले जाते, या अंतर्गत तुम्ही जवळच्या कोणत्याही बँकेतून कर्ज घेऊ शकता.
यामध्ये व्याजही खूप कमी आकारले जाते. याशिवाय काही वर्षांसाठी व्याजात सूट दिली जाते.

या योजनेंतर्गत शेतकरी 4 टक्के व्याजदराने 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेऊ शकतात.
आता ही योजना किसान सन्मान निधी योजनेशी जोडण्यात आली आहे. खत बियाणांसाठी पैसे हवे असल्यास शेतकरी कर्ज घेऊ शकतात.

पंतप्रधान पीक विमा योजना (PM Crop Insurance Scheme)
नैसर्गिक आपत्तीतून शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने ही योजना सुरू केली आहे.
जी वादळ, दुष्काळ, पाऊस, भूकंप, गारपीट यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे होणार्‍या आर्थिक नुकसानीपासून शेतकर्‍यांना दिलासा देते.

मात्र यासाठी शेतकर्‍यांना नोंदणी करावी लागते.
या योजनेंतर्गत जर शेतकर्‍याच्या पिकाचे नुकसान झाले असेल आणि त्याचा विमा या योजनेत असेल तर त्याला 40,700 रुपयांची आर्थिक मदत मिळते.

किसान ट्रॅक्टर योजना (Kisan Tractor Scheme)
या योजनेअंतर्गत शेतकर्‍यांना कृषी यंत्र ट्रॅक्टर दिले जातात. यावर तुम्हाला ट्रॅक्टरच्या निम्मी किंमत दिली जाते.
शेतकर्‍यांना ट्रॅक्टरच्या निम्मी किंमत मोजावी लागते, तर सरकार निम्मी किंमत देते.

तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर त्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र,
बँक तपशील, जमिनीची कागदपत्रे असणे आवश्यक आहे. शेतकरी जवळच्या कोणत्याही CSC केंद्राला भेट देऊन अर्ज करू शकतात.